आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानाचा "बीओटी'वर विकास, सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिणसोलापूर - साेलापूर दक्षिण मतदारसंघातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी क्रीडाशिक्षकांनी चांगल्या प्रकारे काम करावे. त्यांना यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही. बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) या तत्त्वावर नेहरूनगर येथील शासकीय मंद्रूपच्या क्रीडांगणाचा विकास करणार असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

तसेच नेहरूनगर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ होत असलेल्या जलतरण तलावास १५ लाखांचा निधी देणार असल्याचेही त्यांनी म्हटले. लोकमंगल कला, क्रीडा सांस्कृतिक युवक मंडळ आणि दक्षिण सोलापूर क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण सोलापुरातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राचा विकास करावा, असे आवाहन केले.

या बैठकीत नंदू टेळे, जितेंद्र पवार, किरण चौगुले यांनी क्रीडा विकासासंदर्भात सूचना मांडल्या. मंद्रूपचे क्रीडा संकुल अद्ययावत असावे, दक्षिण सोलापूरसाठी मध्यवर्ती ठिकाणी ४०० मीटरचा ट्रॅक असावा, स्पर्धा आयोजनावेळी क्रीडा साहित्य सुविधांचा अभाव असतो, शासनाच्या विविध क्रीडा योजनांची माहिती नाही, खेळाडूंना राज्य मार्ग परिवहनच्या सर्व प्रकारच्या बसमधून प्रवास सवलत मिळावी, स्पर्धा कालावधीत पाण्याची सोय करण्यात यावी, खेळाडूंच्या भोजन भत्त्यात वाढीसाठी पाठपुरावा करावा, ८२ खेळांपैकी काही खेळांची माहिती नाही, जलतरण तलाव त्वरित पूर्ण करावे, या सूचनांचा त्यात समावेश होता.

सचिन सुतळे यांनी आभार मानले. याप्रसंगी जी. आर. तुप्पद, तुप्पद , एस. व्ही. टेळे, व्ही. एस. थळंगे, इब्राहिम शेख, मधुकर कचरे, सचिन शितोळे उपस्थित होते.

९० जणांची उपस्थिती
मंडळाचेउपाध्यक्ष धनंजय पाटील, सोलापूर महापालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख, तालुका क्रीडा अधिकारी नदीम शेख, माजी क्रीडा अधिकारी अरुण पाटील, दक्षिण सोलापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रावण बिराजदार, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. शहर ग्रामीण भागातून सुमारे ९० क्रीडाशिक्षक, संघटक, मार्गदर्शक आणि खेळाडू उपस्थित होते.

क्रीडा साहित्य, व्यायाम शाळेचे प्रस्ताव द्या
आमदार देशमुख यांनी क्रीडा विकासासाठी क्रीडांगणाचे, क्रीडासाहित्याचे, व्यायामशाळेचे प्रस्ताव दिल्यास शासकीय यंत्रणेतून प्रस्ताव मंजूर करून घेण्याचे आश्वासन दिले.