आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजारांची लाच घेताना अभियंत्याला पकडले; बिल मंजुरीसाठी ठेकेदाराकडे मागितले पैसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा- नळ पाणीपुरवठा योजनेत केलेल्या कामाचे बिल मंजुरीसाठी पाठवण्याकरिता दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या करमाळा येथील  ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातील शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करमाळा पंचायत समितीत ही कारवाई करण्यात आली. चिमाजी जाधवर असे अाराेपीचे नाव आहे.   

करमाळा येथील ठेकेदार  अजित साठे यांनी मोरवड(ता. करमाळा) येथील नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काम केले होते. या कामासाठी पंधरा लाख रुपयांचा खर्च झाला होता. त्याचे बिल  मिळण्यासाठी करमाळा येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालयात अर्ज केला. बिल मंजुरीचे काम शाखा अभियंता चिमाजी अर्जुन जाधवर यांच्याकडे होते. बिलासाठी ठेकेदार  साठे यांनी वारंवार हेलपाटे मारूनही रक्कम मंजूर होत नव्हती. सोलापूर कार्यालयात बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी जाधवर यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. ठेकेदार जाधवर यांनी पैसे देण्याचे मान्य केले. दरम्यान, त्यांनी सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत लेखी तक्रार केली.  शुक्रवारी पैसे देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पथकाने सापळा रचून जाधवरला पैसे घेताना पकडले.
बातम्या आणखी आहेत...