आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम पावसासाठीचा पहिला प्रयोग फसला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मराठवाडा, विदर्भ प.महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने शासन कृत्रिम पाऊस पाडून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात ऑगस्ट रोजी कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग मंगळवेढा माढा तालुक्यात करण्यात आला होता. मात्र हा प्रयोग अयशस्वी झाला.
याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने कृत्रिम पावसाचे प्रयोग होत आहेत. गुरुवारी (दि. ६) दुपारी वाजता मंगळवेढा तालुक्यातील डोणज, हुलजंती, मरवडे, नंदूर याठिकाणी फायर करण्यात आले. माढा तालुक्यातील माढा, निमगाव, उपळाई खु., सापटणे घाटणे येथे वाजून १३ मिनिटांनी तर वडशिंगे, म्हैसगाव, तांदूळवाडी तडवळे याठिकाणी वाजून २३ मिनिटांनी रॉकेट फायर करण्यात आले. वरील तीनही ठिकाणी रॉकेट फायर करण्यात आले होते. मात्र यामुळे पाऊस पडलाच नाही. दौंड तालुक्यातील गलांडवाडी, इकेरीवाडी पिंपळगाव परिसरातही दुपारी ३.३० वाजता फायर करण्यात आले होते. मात्र त्याठिकाणीही यश आले नाही. गेल्या चार दिवसांपासून शहर जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार होत असून त्याचे रूपांतर प्रत्यक्ष पावसात होत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी शहर परिसरात सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यम सरी कोसळल्याचे वृत्त आहे. आता पुन्हा कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार याबाबत शनिवारपर्यंत शासनाकडून प्रशासनाकडे कोणतीही माहिती दिली नसल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात पावसासाठी अनुकूल वातावरण पाहता कृत्रिम पावसासाठी दुसरा प्रयोग होण्याची शक्यता आहे.
परिणाम झाला नाही
कृत्रिम पावसाचा प्रयोग मंगळवेढा माढा तालुक्यात करण्यात आला. दोन तालुक्यात रॉकेट फायर करण्यात आले, मात्र त्याचा परिणाम झाला नाही. ज्याठिकाणी ढगाळ वातावरण आहे, त्याची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती मुंबईतील संबंधित कार्यालयास दिल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी