आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीनेसह ओढे, नाले भरून वाहू लागले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्कलकोट - शहरपरिसरात शुक्रवारीही उत्तराच्या पावसाने दमदार हजेरी लावली. सततच्या पावसाने सर्वत्र ओढे, नाले दुथडी भरून वाहत अाहेत. मैंदर्गी येथील ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने सकाळी आठ ते १० या दोन तासा वाहतूक बंद होती. बादोले येथील पूलही पाण्याखाली गेला होता. वागदरी भागातील शिरवळवाडी येथील तलाव १९९८ नंतर प्रथमच १०० टक्के भरला. कुरनूर धरण शंभर टक्के भरले आहे. तसेच धरण क्षेत्राच्या वरच्या भागात पावसाचा जोर चांगला असल्याने शुक्रवारी कुरनूर धरणातून प्रतिसेकंद ३००० क्युसेक विसर्ग खाली सोडण्यात येत आहे.
कुरनूरमधून सोडलेल्या पाण्यामुळे धरणाच्या खालील आठही बंधारे भरले आहेत. अक्कलकोटला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरनूर धरणासाह हालचिंचोळी तलाव, सांगवी बंधारा, हिळळी नदीपात्रामध्ये पाणी भरल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. सायंकाळच्या वेळेस पावसाचा जोर चांगला होता. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. तालुक्यात एकूण ३३७१ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी दिली. वास्तविक संततधारमुळे तहसीलमधील आपत्कालीन व्यवस्था फोन नंबर सुरू असणे गरजेचे आहे. पण रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयातील फोन संपर्कासाठी केल्यावर नुसताच वाजत होता.
माढ्यात उतरा नक्षत्राचा पाऊस, रब्बीसाठी फायदेशीर
तालुक्यात गुरुवारी शुक्रवारी झालेल्या उत्तरा नक्षत्राच्या पावसाने रब्बी पेरणीसाठी आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. तर पावसाअभावी अडचणीतील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली आहे. पुणे परिसरात पाऊस जोरदार पडत असल्याने उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. तालुक्तातील ओढे, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. तर दोन दिवसांच्या भीज पावसाने शेतातील ताली भरून शेतात पाणी साचल्याचे दिसत आहे. गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरूच होता. तसेच शुक्रवारीही दिवसभर रात्रभर पाऊस पडतच राहिला. उंदरगाव येथे सीना नदी या दुथडी भरून वाहू लागली आहे. तेथील मका पीक पावसाखाली गेले. यामुळे नुकसान झाले आहे.
रात्रीही संततधार
उत्तरा नक्षत्राच्या रिमझिम हजेरीने रब्बीविषयी आशा निर्माण झाली आहे. मात्र मोठ्या पावसाची गरज आहे. अद्याप ओढे, नाले, विहिरी तहानलेल्याच आहेत. वडाळा मंडल वगळता इतरत्र पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पावसाने जोर धरला. सुमारे आर्धा तास जोरदार सरी बरसल्या. नंतर मात्र काहीसा जोर कमी झाला. रात्री उशिरापर्यंत संततधार सुरू होती. गुरुवारी रात्री आठला पावसाला सुरुवात झाली. मात्र पहाटेपर्यंत रिमझिमच हाेती. शुक्रवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. आगामी हस्त नक्षत्रात जोरदार पाऊस पडल्यास शेतीच्या पाण्याची चिंता मिटू शकते. शेळगी मंडलात १३ वडाळामध्ये २२, मार्डीत २४ तर तिऱ्हे मंडलात २२ मिमी पाऊस पडला.
दोन तास वाहतूक बंद
शहर तालुक्यात उत्तरा नक्षत्राने दमदार हजेरी लावल्याने तुरीसह खरीप पिकांना जीवदान मिळाले. रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. चार दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. शुक्रवारपर्यंत तालुक्यात सरासरी ३७०.५७ मि.मी. (६८.८१ टक्के) पाऊस झाला आहे. गुरुवारी सरासरी ३२.४ मि.मी. पाऊस झाला. गुरुवारी पहाटेपासून झालेल्या पावसाने शहरातील शंकेश्वर बोळातील रामलिंग काळे यांच्या घराची भिंत कोसळून त्यात त्यांच्या पत्नी नीलावती काळे जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले. त्यांच्या पाठीला पायाला मुका मार लागला. घराची पडझड झाल्याने कुटुंब उघड्यावर आले. तहसील कार्यालयाने या नुकसानीचा पंचनामा केला. बार्शी, गौडगाव, पानगाव उपळे दुमाला या चार मंडलमध्ये आठवड्यापूर्वी बऱ्यापैकी पाऊस झालेला होता. परंतु नारी, खांडवी, पांगरी, वैराग आगळगाव मंडलमध्ये अत्यल्प पाऊस पडला होता. चार दिवसांपासून सर्वदूर पाऊस आहे. दहापैकी नऊ मंडलात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
माढा १२.८, मोडनिंब ३, कुर्डुवाडी १०.३, लऊळ ४२, दारफळ १८, टेभुर्णी ३९, रोपळे ३१,रांझणी १४, म्हैसगाव २९. एकूण १९९. ४. तर आतापर्यंत तालुक्यात सरासरी ३५५.७३ मिमी पाऊस पडला.
बातम्या आणखी आहेत...