आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचव्या दिवशीही संततधार,बंधाऱ्यांची दारे उघडल्याने धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-बार्शी - रस्त्यावरील राळेरास येथील पर्यायी तात्पुरत्या पुलावरून वेगाने पाणी वाहत होते. पाण्याच्या दाबामुळे पूल खचला आहे. याची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी तातडीने वाहतूक बंद केली. सोलापूरकडे जाणाऱ्या बस वैराग, जवळगावमार्गे सोडल्याने सोलापूरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. राळेरास, धामणगाव, शेळगाव, दारफळ, वडाळा, नान्नज येथील प्रवाशांची मात्र गैरसोय झाली.
मंगळवेढा उजनीच्याडाव्या उजव्या कालव्यामधून पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला अाहे. मंगळवेढा, पंढरपूर मोहोळ तालुक्यांतील सर्व साठवण तलाव बंधारे भरून द्यावेत. तसेच माण नदीमधे पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्री यांनी दिल्याची माहिती आमदार भालके यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी पाणी सोडण्याची मागणी झाली होती.
सोलापूर गेल्याआठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणाची पाणीपातळी ८६ टक्क्यांवर पोहोचली आहे. दौंड येथून धरणामध्ये २४ हजार क्युसेकचा विसर्ग सुरूच आहे. विसर्गात वाढ झाल्यास पूरस्थिती उद््भवू नये, याची काळजी म्हणून शनिवारी सायंकाळी उजनी धरणातून कालव्याद्वारे १५०० क्युसेक तर सीना नदीत ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांनी दिली. भीमा नदी पात्रामध्ये धरणपातळी ९८ टक्के झाल्यानंतर पाणी सोडण्यात येणार आहे. धरणामध्ये एकूण १०९ टीएमसी पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ४६ टीएमसी इतका आहे.

गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी झालेल्या पावसाची जिल्ह्यात २३.९८ मि.मी. इतकी नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी सर्वाधिक ५३ मि.मी. पाऊस माळशिरस तालुक्यात झाला आहे. त्यानंतर करमाळा तालुक्यात ३९ तर उत्तर सोलापूर तालुक्यात २९.५० मि. मी. पाऊस झाल्याची नोंद केली.
माढा पावसामुळेउंदरगाव येथे सीना नदी दुथडी भरून वाहत आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. शनिवारी चार ते पाच घरांच्या भिंती कोसळल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, येथील बंधाऱ्याची दारे उघडल्याने पाणी असेच वाढत राहिल्यास नदीकाठावरील गावांना धोका होऊ शकतो.

शनिवारी उंदरगाव, केवड परिसरात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, या नदीवरील बंधाऱ्याची दारे काढल्याने पाणी नदीकाठच्या शेतात गावात घुसून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी दोन दिवसांपासून भीमा विकास मंडळाच्या अधिकारी यांच्याकडे दारे उघडण्याची मागणी कत आहेत. मात्र दारे उघडली नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील धरणातूनही लवकरच सीना नदीत पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी दारे काढण्याचे आश्वासन दिले. तसेच बंधाऱ्याची दारे उघडल्यास होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीस प्रशासनच जबाबदार असेल, असे उदंरगावचे शेतकरी किरण चव्हाण म्हणाले. तहसीलदार सदाशिव पडदुणे यांना विचारले असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दुपारी याची सूचना दिल्याचे सांगितले.
समाधानकारक चित्र |माढा तालुक्यात सीना नदी दुथडी भरून, उंदरगावात घरांची पडझड
जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही संंततधार पाऊस सुरूच होता. काही तालुक्यांत जोरदार तर काही ठिकणी कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस पडला. मागील २४ तासांत २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात माळशिरस तालुक्यांत सर्वाधिक ५३ मिलिमीटर पाऊस पडला. उजनीत ८६ टक्के जलसाठा झाल्याने कालव्यांतून पाणी सोडण्यात आले आहे. तर सीना नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे. बार्शीतील नागझरी नदीला पाणी आल्याने काही ठिकाणी वाहतूक खोळंबली.
करमाळा | गेल्यापाच दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे सीना नदीला पाणी आले आहे. त्यामुळे चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर कोळगाव धरणात ७०.५० दलघमी म्हणजे ५० टक्के जलसाठा झाला आहे.

तालुक्यात जून-जुलैमध्ये खूपच अल्प प्रमाणात पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनीमध्ये पाणीसाठा वाढल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न मिटला होता. परंतु पूर्व भागातील गावांत दुष्काळी स्थिती कायम होती.

२००८ मध्ये सीना कोळगाव धरण झाले. २०१२ ला पाणी आले. त्यानंतर पाणीप्रश्न कायमचा मिटेल, असे वाटत होते. त्यानंतर चार वर्षांत पाऊस झाल्याने विकत घेऊन पिण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली होती. चार वर्षांपासून सीना कोळगाव धरण पावसाअभावी कोरडे होते. तरीही शेतकऱ्यांना वीजबिल भरावे लागले होते. त्यामुळे कुकडीतून वाहून जाणारे पाणी या प्रकल्पात सोडण्याच्या मागणीसाठी शिवसनेचे शाहू फरतडे यांनी याप्रश्नी मंुबई पदयात्रा काढली होती. आजपर्यंत आठही मंडलांत सरासरी ३३४.१२ सरासरी पाऊस झाला आहे.
मंगळवेढा गेल्यादोन दिवसांत पावसामुळे तालुक्यात सूर्यदर्शन झाले नाही. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या २६४. मि.मी.म्हणजेच जवळपास ५० टक्के पाऊस झाला आहे. वाफसा येण्यास दहा ते बारा दिवस लागतील. त्यानंतर पेरणीला सुरुवात होईल. मंगळवेढा मंडलात ४४८.७२, मरवडे १२८, आंधळगाव २२८, मारापूर ३१२ मि. मी. पाऊस झाला आहे.
वैराग | गेल्यादोन दिवसांत तुळजापूर तालुका आणि गौडगाव (ता. बार्शी) परिसरात झालेल्या पावसामुळे नागझरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे राळेरास येेथील या नदीवरील पर्यायी तात्पुरता पूल खचल्याने पोलिसांनी सोलापूरकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. तर सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्या वैराग, जवळगावमार्गे सोडण्याचा निर्णय बार्शीचे आगारप्रमुख अनिलकुमार घेवारे यांनी घेतला. राळेरास येथील युवकांचे बचावकार्य प्रवाशांसाठी दिलासा देणारे ठरत आहे. दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास पुलावरील पाणी ओसरल्याने बार्शी-सोलापूर वाहतूक पूर्ववत झाली. परंतु ठेकेदाराकडून पुलाची दुरुस्ती झाली नव्हती. त्यामुळे वाहतूक धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत.
आॅगस्टमध्ये कोरडेठाक असलेल्या कोळगाव धरणात ५० टक्के जलसाठा झाला आहे.
शुक्रवारी झालेला तालुकानिहाय पाऊस
उत्तरसोलापूर २९.५०, दक्षिण सोलापूर १८.९०, बार्शी २३.४०, अक्कलकोट १७.४४, मोहोळ १८.०८, माढा २६.४८, करमाळा ३९.१३, पंढरपूर २१.३३, सांगोला १०.१६, माळशिरस ५३, मंगळवेढा ६.४०, एकूण २३.९८.
---------------
बातम्या आणखी आहेत...