आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथरुड, वालवड परिसरात मुसळधार पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईट/ वालवड/ पाथरूड - आठ दिवसांपासून दमदार परतीचा पाऊस होत आहे. मंगळवारी (दि. २०) झालेल्या पावसामुळे भूम तालुक्यातील अंतरवली येथील तिंत्रज, अंतरवली साठवण तलाव वाहून गेले आहेत. याची पाहणी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, पंचनामा झाला नाही. यामुळे बनावट कामाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
भूम तालुक्यात आठ दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे तालुक्यातील दोनपेक्षा अधिक साठवण तलाव वाहून गेले असून काही फुटण्याच्या मार्गावर आहेत. फुटलेल्या तलावामुळे हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. दमदार पावसामुळे पाणी झाले असले तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तालुक्यातील अनेक छोटे मोठे तलाव, बंधारे भरून वाहत आहेत. काही बनावट कामे झाल्यामुळे तलाव फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तालुक्यातील अंतरवली येथील दोन साठवण तलाव आहेत. यातील तिंत्रज, अंतरवली साठवण तलाव फुटल्याने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील दुसरेही काही साठवण तलाव फुटण्याच्या मार्गावर असून पाणी वाया जाऊन शेतीचे नुकसान होईल. यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजन करण्याची गरज आहे.

गाय गेली वाहून
भूम तालुक्यातील अंतरवली येथील पाझर तलाव फुटल्याने देवगाव (बु.) येथील नळी नदी काठी राहणाऱ्या भारत सुदाम कदम यांचे पत्रे घरासमोर बांधलेली एक गाय पाण्यात वाहून गेली. या पावसाने समाधान होत असले तरी हातातोंडाशी आलेली पिके वाया जात आहे.

वालवडजवळ दुधना नदीचे पाणी अडवण्यासाठी मागील उन्हाळ्यामध्येच सिमेंट बंधारा बांधण्यात आलेला आहे. जलसंधारणांतर्गत करण्यात आलेल्या या कामामध्ये नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पाण्याने बंधाऱ्याच्या बाजूने पिचिंगचा भराव फोडून स्वत:ला वाट करून घेतली. मात्र हे पाणी जवळच्या शेतामध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंधारा फुटल्याने साठलेले पाणीतर वाहून गेलेच शिवाय पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे मे २०१६ मध्ये १७ लाख रुपये खर्चून हा बंधारा उभारण्यात आला होता.

वालवडजवळ बंधाऱ्याचा भराव गेला वाहून
पाथरुड, आनंदवाडी, बेदरवाडी वालवड परिसरात मंगळवारी जोरदार मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आनंदवाडी येथील गावाजवळील पाझर तलाव फुटून परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे पाण्याच्या दाबाने वालवडजवळ दुधना नदीवरील बंधाऱ्याच्या बाजुची पिचींग फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

आनंदवाडी गावालगतचा पाझर तलाव मुसळधार पावसाने फुटल्याने शेतकरी चंद्रभान वनवे यांच्या शेतीचे माेठे नुकसान झाले. सुदैवाने गोठ्यातील जनावरांनी दोऱ्या तोडल्याने ती बचावली. मंगळवारपाठोपाठ बुधवारीही पाथरुडसह, अंतरवली, सावरगाव, अंभी, आनंदवाडी, नान्नजवाडी, बेदरवाडी, दुधोडीसह संपूर्ण मंडळामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही परिसरात सकाळपासून ते दुपारी वाजेपर्यंत पाऊस पडला.
बातम्या आणखी आहेत...