आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानतर्फे आदर्श पत्रकार पुरस्कारांचे झाले वितरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर :पत्रकाराने टीका करता नेहमी चांगलेच लिहावे, अशी अपेक्षा योग्य नाही. पत्रकार हे कर्तव्यबुद्धीने समाजाला दिशादर्शक कार्य करत असतात, असे मत महापालिका आयुक्त विजयकुमार काळम यांनी व्यक्त केले. रंगभवन येथील कामगार कल्याण केंद्रात श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते झाले.
 
दिव्य मराठीचे युसूफ शेख यांच्यासह पत्रकार पुरुषोत्तम कारकल, काशिनाथ वाघमारे, विजय गायकवाड, विकास कस्तुरे, रोहित थळवे, विनोद पोतदार यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी माहेश्वरी प्रगती मंडळाचे रामानुज होलाणी, उद्योजक हर्षल कोठारी, जनकल्याण मल्टिस्टेटचे राजेंद्र हजारे, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे महेश कासट, प्रसाद मोहिते, अक्षय यलगर, शुभम हंचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
बातम्या आणखी आहेत...