आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुना बांधकाम कार्यशाळेचे उद्घाटन, इंट्याक सोलापूर तर्फे लोकमंगल प्रशिक्षण केंद्र येथे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - इंट्याक सोलापूर आयोजित चुना बांधकाम कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सोमवारी (दि. ९) सकाळी लोकमंगल प्रशिक्षण केंद्र, शेळगी येथे झाले. समन्वयक सीमंतिनी चाफळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले कार्यशाळेचे प्रयोजन सांगितले. 

चुना आपले पारंपरिक बांधकाम साहित्य असून सध्या वापरात नाही. ते पर्यावरणपूरक, स्थानिक कौशल्याला वाव देणारे, टिकाऊ मजबूत असल्याने त्याचा वापर पुन्हा सुरू करणे आवश्यक बनले आहे. व्यासपीठावर इंट्याकच्या श्वेता कोठावळे, दिल्लीहून कार्यशाळा घेण्यासाठी आलेले संवर्धन तज्ज्ञ नवीन पिपलानी, सह आयोजक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे मनोज मर्दा, कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्रा. कोंडा, लोकमंगल प्रतिष्ठानचे अविनाश महागावकर, पुरातत्त्व खात्याचे हरीश दसाडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. 

श्वेता कोठावळे यांनी मान्यवरांचे भेटवस्तू देऊन स्वागत केले. नवीन पिपलानी यांनी या कार्यशाळेचे फायदे थोडक्यात विशद केले. प्रा नरेंद्र काटीकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी पुष्पांजली काटीकर, अमोल चाफळकर, सविता दीपाली, शिरीष कोठावळे यांनी परिश्रम घेतले. त्यानंतर दिवसभर चुना बांधकाम तंत्राची चर्चा करणारी विविध सत्रे नवीन पिपलानी यांनी घेतली. कार्यशाळेसाठी सोलापुरातील तसेच बाहेरगावचे सुमारे सत्तर नोंदणीकृत प्रतिनिधी उपस्थित आहेत. यामध्ये आर्किटेक्ट, इंजिनिअर, बिल्डर, मिस्त्री विद्यार्थी यांचा समावेश आहे. कार्यशाळा १२ जानेवारीपर्यंत असून १० ११ रोजी प्रात्यक्षिक सत्रे सोलापूर किल्ल्यात आहेत. १२ रोजी स्थळ भेट गुलबर्गा इथे चुन्यातील बांधकाम पाहण्यासाठी होणार आहे. 
 
मंगळवारी भुईकोट किल्ल्यात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक झाले. यावेळी चुना कसा कालवावा? कोणत्या प्रकारचा चुना घ्यावा, तो लिंपावा कसा, दगड कसे ठेवावेत? यावर प्रात्यक्षिक सादरीकरण झाले. यात बहुसंख्येने सोलापूरकर सहभागी झाले होते.