आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे पॅसेंजरचा प्रवास आता आरामदायक; एका डब्यातून 150 ते 160 जण करणार प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर- पुणे पॅसेंजर गाडीने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता आरामदायक कुशन असलेल्या सीटवरून होणार आहे. कारण या पॅसेंजरला आता नवीन लोकलचा (डेमू) रेक जोडण्यात आला आहे. मंगळवारपासून हा रेक प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. या निमित्ताने पहिल्यांदाच सोलापूर विभागात लोकलचा रेक धावत आहे. 

सोमवारी दुपारी ३.५० वाजता नव्या रेकचे सोलापूर स्थानकावर आगमन झाले. गाडीचेआगमन होताच प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. पहिल्यांदाच सोलापूर स्थानकावरून लोकल रेक धावत असल्याने सर्वांच्याच तो चर्चेचा विषय होता. अमित अमोलिक प्रसाद अनंतकवळस हे या रेल्वेचे पहिले चालक होते. गाडीच्या वेळेत, थांब्यात दरात रेल्वे प्रशासनाने कोणतेच बदल केलेले नाही. 

प्रवासी संघटनांकडून नव्या रेकचा निषेध
मंगळवारी सोलापूर -पुणे पॅसेंजरला लोकलचा नवीन रेक जोडण्यात आला. प्रवाशांसाठी हा रेक गैरसोयीचे असल्याचे सांगत सोलापूर रेल्वे प्रवासी संघाने याचा निषेध केला आहे. पूर्वीचा रेक जोडण्याची मागणी केली आहे. सोलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजा जाधव तसेच राजू कांबळे यांनी निषेध करत हा नवीन रेक हुतात्मा एक्स्प्रेसनंतर सकाळी नऊच्या सुमारास पुण्यासाठी सोडून नवीन रेल्वे सुरू करावी, अशी मागणी केली आहे. 

एका डब्यातून १५० ते १६० जण करणार प्रवास 
- गाडीला दोन्हीबाजूंनी इनबिल्ट इंजिन देण्यात आले. दोन्ही बाजूंनी गाडी धावू शकते. त्यामुळे इंजिन बदलण्याची झंझट आता राहणार नाही. त्यामुळे वेळ पैसा दोन्ही वाचणार आहे. 
- ३२०० अश्व शक्तीचे याचे इंजिन आहे. या इंजिनमुळे ध्वनी वायुप्रदूषण कमी होते. 
- प्रत्येक डब्यात प्रवाशांच्या सोयीसाठी शौचालय, स्लायडिंगचे दरवाजे, फॅन, दिवे सह डिस्प्ले बोर्ड देण्यात आले. या बोर्डवर पुढचे स्थानक येण्यापूर्वीच प्रवाशांना माहिती मिळणार आहे. डब्यात त्या स्थानकाची उद््घोषणा होणार आहे. 
- १० डबे जोडण्यात आलेले आहे. प्रत्येक डब्यात ८० प्रवाशांची अासन क्षमता आहे. प्रवाशांना उभारता यावे यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दोन्ही सीटच्या मध्ये पर्याप्त जागा असल्याने प्रवाशांना बसून प्रवास करणे त्रासदायक होणार नाही. 
बातम्या आणखी आहेत...