आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण लवकरच सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे अर्थसंकल्पात नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी सोलापूर विभागातील दोन रेल्वे मार्गांना मंजुरी देण्यात आली होती. यात गुलबर्गा -लातूर जेऊर -आष्टी या मार्गाचा समावेश होता. सोलापूर रेल्वे प्रशासनाने या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निविदा मागवण्याचे काम सुरू केले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांत मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतरच नव्या मार्गाचे काम सुरू होईल. अन्यथा हे केवळ सर्वेक्षणापर्यंतच थांबेल.
चालू अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाने सोलापूर विभागातील दोन मार्गांना सर्वेक्षणास मंजुरी दिली होती. त्या कामास येत्या ऑक्टोबर महिन्यापासून प्रारंभ होईल. सर्वेक्षण करताना मार्गावरील चढ -उतार, नद्या, पूल आदी बाबतची माहिती घेतली जाईल.

यानंतर या कामासाठी किती खर्च होईल. या मार्गामुळे किती किमीची बचत होईल आदी बाबतची सविस्तर माहिती रेल्वे बोर्डला कळवण्यात येईल. सर्वेक्षणाची माहिती मिळाल्यानंतरच रेल्वे बोर्डवर निर्णय घेईल. सध्या गुलबर्गाहून लातूरला जाण्यासाठी गुलबर्गा, सोलापूर, कुर्डुवाडी या मार्गाचा वापर केला जातो. सर्वेक्षणात गुलबर्गा ते लातूर दरम्यानचे अंतर १४८ किमी इतके दिले आहे. तसेच जेऊर ते आष्टी दरम्यान ७८ किमींचे अंतर दिले आहे.

या मार्गास मंजुरी मिळाली तर प्रशासनाचे किमान ५० ते १०० किमीची बचत होण्यास मदत मिळणार आहे. अहमदनगर -बीड दरम्यान रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. जेऊर ते आष्टीचा रेल्वे मार्ग याच मार्गाला जोडण्याचा प्रस्ताव अाहे.
^गुलबर्गा -लातूर जेऊर - आष्टी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामास लवकरच प्रारंभ होईल. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर याचा अहवाल रेल्वे बोर्डला पाठवून देण्यात येईल. मार्गाबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात येईल. सुनीलमस्के, उप मुख्य अभियंता, मध्य रेल्वे, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...