आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक हृदयरोग दिन: रक्तवाहिन्या बंद होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आढळते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हृदयविकार तारुण्यामध्ये येण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एका वर्षात २० ते ४० वयोगटातील चार व्यक्तींना मृत्यूने कवटाळले. छातीत दुखणे, दम लागणे आदी लक्षणे असल्यास आराम केल्यास बरे वाटते, निसर्गाने काही सिग्नल दिल्यास त्याचा गांभीर्याने विचार करावा. सुशिक्षित नागरिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार करतात, मात्र अशिक्षितांमध्ये जनजागृती नसल्याने दुर्लक्ष करतात. विविध प्रकारच्या व्यसनामुळे रक्तवाहिन्या बंद होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त अाहे, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे यांनी केले. 
 
जागतिक हृदय रोग दिनानिमित्त डाॅ. अंधारे यांच्याशी संवाद साधला, त्याप्रसंगी माहिती देताना ते बोलत होते. डॉ. अंधारे म्हणाले की, जन्मजात हृदयविकार, झडप समस्या रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे अॅटक येऊ शकतो. रक्तवाहिन्या बंद असल्यामुळे अॅटक येण्याचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषाचे प्रमाण जास्त आहे. महिलांना मासिक पाळी साधारणपणे ४५ वयापर्यंत येत असल्यामुळे त्यांना हृदय विकार येत नाही. 
 
जन्मजात हृदयविकार होण्याचे प्रमाण १०० मागे २० टक्के. झडप समस्येमुळे ३० टक्के तर रक्तवाहिनी ब्लॉक असल्यामुळे ५० टक्के हृदय विकार होण्याचे प्रमाण आहे. पूर्वी वयोमानापासून साठ वर्षांनंतर हृदय विकार येत होता. परंतु आता २० वर्षे अलीकडेच हृदय विकार येत आहे. 
 
जन्मजात हृदयविकारात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त 
तंबाखू खाण्यामुळे रक्तवाहिनीच्या आतील पातळ पडदा खराब होतो, रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हा पडदा महत्त्वाची भूमिका बजावतो. पडद्यामध्ये प्रोटीन सी एस दोन घटक रक्त प्रवाह व्यवस्थित ठेवतात. तंबाखूमधील निकोटिन पडदा खराब करतात. रक्तवाहिन्यामध्ये गाठी तयार हाेऊन ब्लाॅकेज होतात. व्यसन असलेल्या तरुणांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. साधारणपणे जन्मजात हृदयविकार होण्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. 
- डॉ.विजय अंधारे, हृदयरोग तज्ज्ञ 
बातम्या आणखी आहेत...