आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सवासाठी बेकायदा वीज जोडून घेण्यात धोका, गंभीर अपघात जीवावर बेतू शकतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोणताही सण-उत्सव म्हणजे प्रत्येक समाजबांधवांच्या आनंदाला उधाण आलेले असते. आपले मंडळ किंवा आपला चौक इतरांपेक्षा वेगळा दिसावा म्हणून प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. परंतु यात नकळत काही गैरमार्गांचा अवलंब होत चुकीचे प्रकार होतात. यात प्रामुख्याने असतो तो विजेचा. वीजचोरी करून विद्युतरोषणाईने परिसर उजळवून काढावा या उद्देशापोटी हा प्रकार होतो. एकाअर्थी हा गुन्हा तर ठरतोच,तसेच यात चुकीच्या पद्धतीने जोडणी केल्याने जीवितास धोकाही निर्माण होऊ शकतो.
वीज देणारी महावितरण कंपनी असली तरी वीज वितरणच्या खांबांवरून वाहणारा प्रवाह अतिउच्च दाबाचा असतो. त्यावरून थेट जोडण्या घेताच येत नाहीत. कारण या वाहिनीत ११ हजार व्होल्टचा विद्युतप्रवाह असतो. या वाहिनीवरून जोडणी घेतली तर मोठा स्फोट होणे किंवा शॉर्टसर्किट असे प्रकार होतात. मोठी दुर्घटना होण्याचा संभव असतो. महावितरणची असे टेम्पररी कनेक्शन देण्याची सुविधा आहे. याद्वारे गणेशोत्सव, नवरात्र, आंबेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयंती, मोहरम, बेगम बाजार किंवा अन्य कोणत्याही सण उत्सवावेळी महानगरपालिकेकडून तात्पुरती वीज जोडणी करून देण्यात येते. मंडप किंवा सजावटीचा आकार लांबी पाहून याचा दर ठरलेला असतो. अत्यल्प दरात ही सुविधा आहे.

वीजपुरवठा समस्येवर महावितरणला करा संपर्क
Âलकीचौक, नवीवेस शाखा : २७४९८४७, ७८७५७६४०
Âतुळजापूर वेस, वॉटर वर्क्स : २७४९८५६, ७८७५७६८९२
Âसिव्हिल हॉस्पिटल उपकेंद्र : २७४९८५४, ७८७५७६३९१
Âकविता नगर, घरकुल केंद्र : २७४९८४२९, ७८७५७६४२९
Âगुरुनानक, जुळे सोलापूर : २७४९८६४, ७८७५७६८३९२

^कोणत्याही उत्सवकाळात वीज जोडणी घेताना सुरक्षा महत्त्वाची आहे. अनधिकृतपणे जोड घेऊच नये. कारण थेट आकडे वगैरे टाकून जोडण्या घेतल्या तर विद्युतप्रवाह मोठा असल्याने जीवितास धोका असतो. तसेच, या काळात काही समस्या निर्माण झाली तर शहराच्या पाच उपकेंद्रातून समस्या निवारण्याचे काम करण्यात येते. त्यांच्या क्रमांकासह अाम्ही प्रत्येक उत्सव काळात त्याचे प्रसिद्धी करण करत असतो. अधिकृतरीत्या जोडण्या घेतल्या असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही होते.” सुरेशकोळी, कार्यकारी अभियंता, वीजवितरण कंपनी

ही सावधगिरी घ्या
Àविजेच्या केबल जमिनीखालून गेल्या आहेत. मंडपासाठी खड्डे करताना काळजी घ्यावी.
Àविजेच्या तारांच्या तुलनेत मंडपाची किंवा कमानीची उंची त्यापेक्षा खाली असावी
Àवायरिंग मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून, तपासणी अहवाल महावितरणकडे जमा करावा.
Àतात्पुरते कनेक्शनचे मीटर सुरक्षित जागी बसवावे, पाऊस लागण्याची काळजी घ्या
Àविजेच्या खांबांवर पताका अथवा पोस्टर चिकटवू नये, गंभीर अपघाताचा धोका.
Àमिरवणुकीत वाहन, मूर्ती अथवा फलक तारांना चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
सुरक्षा महत्त्वाची आहे
विद्युत जोडण्या देणाऱ्या महावितरणच्या पाच अधिकाऱ्यांशी थेट प्रश्न
Áकोणत्याही उत्सवावेळी तात्पुरत्या जोडणीसाठी अर्ज येतात का? À होयेतात. ते केवळ मंडळ किंवा विद्युत रोषणाईचे नसून विविध दुकाने, रसपान गृह आदींचे असतात.
Áप्रतिवर्षीकिती जोडण्या देता? Àशहरातील पाच विभागांमधून प्रतिवर्षी एका उत्सवात किमान ४० ते ५० जोडण्या दिल्या जातात.
Áत्याचीअंदाजे मुदत ठेव किती असते? Àप्रत्येक दुकान किंवा मंडळाच्या विद्युत लोडनुसार ते १५ हजार इतकी मुदत ठेव घेतली जाते. उत्सवानंतर ती बिल भरल्यावर परत करण्यात येते.
Áहेफायदेशीर आहे का? Àहो, हे फायदेशीर आहे. यामुळे सुरक्षित वीज कनेक्शन मिळते आणि कोणताही धोका रहात नाही.
Áनागरिकांसाठीकाय आवाहन? Àउत्सव साजरा करणाऱ्या सर्व समाज बांधवांनी असे कनेक्शन घ्यावे. ज्यामुळे उत्सवात सुलभता होईल. कोणतीही दुर्घटना होणार नाही.
Áवीजचोरीवर काय कारवाई होते? Àवीज चोरी केल्यावर मुंबई कायद्यानुसार जी कलमं आहेत, त्यानुसार कारवाई होते, तसेच रोख रकमेचा दंडही हाेतो.
असे आहेत दर (प्रति युनिट रुपयांमध्ये)
घरगुती
ते १०० युनिट रुपये ७६ पैसे
१०० ते ३०० रुपये २१ पैसे
३०० च्या पुढे ५०० रुपये ९५ पैसे
उत्सव काळातील तात्पुरत्या मीटरचे दर
रुपये ७१ पैसे प्रति युनिट

अनामत रक्कम परतावा ही
५०० व्हॅटसपर्यंत किंवा त्यापुढे हजार २०० व्हॅटस् पर्यंत किमान हजार रुपये अनामत रक्कम घेतली जाते. शिवाय हे वीजबिले जमा केल्यावर अनामत रक्कम त्वरित परत देण्यात येते.
-------------------
बातम्या आणखी आहेत...