आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव मंडळांना मिळणार शासनाचे दोन लाखांचे बक्षीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंदाच्या गणेशाेत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यांनी हा उत्सव सार्वजनिक केला, त्या बाळ गंगाधर टिळकांची १६० वी जयंती आहे. त्यांनी दिलेल्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे...’ या घोषणेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या सर्व आैचित्याला धरून राज्य शासनाने ‘लोकमान्य शताब्दी महोत्सव’ जाहीर केला. त्याचाच एक भाग म्हणून राज्यपातळीवर गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली आहे.
वर्षभर विविध कार्यक्रम साजरा करण्यासाठी ‘लोकमान्य लोकोत्सव समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीने ही आरास स्पर्धा जाहीर केली. तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर या स्पर्धा हाेतील. तालुक्यातून प्रथम येणाऱ्या मंडळाला २५ हजार, जिल्ह्यासाठी लाख तर विभागासाठी तब्बल दोन लाख रुपयांची पारितोषिके आहेत. यासाठी २७ जणांची राज्यस्तरीय समिती नियुक्त करण्यात अाली. राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे समितीचे अध्यक्ष अाहेत.

सोलापूरकडून प्रेरणा; आजोबांना १३१ वर्षे!
ब्रिटिश काळात महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्षे होत असली तरी सोलापूरच्या आजोबा गणपती सार्वजनिक मंडळाला १३१ वर्षे होत आहेत. टिळकांना येथूनच प्रेरणा मिळाली आणि त्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक करण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्धचे संघटन हे या उत्सवाच्या माध्यमातून अभिप्रेत होते. त्यांच्या या संकल्पनेपूर्वीच सोलापुरात श्रद्धानंद समाजाने आजोबा गणपतीच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या गणपतीच्या पूजेसाठी तेव्हा लोकमान्य टिळक सोलापूरला आले होते.

असे समिती सदस्य
राज्य सरकारच्या आदेशानुसार लाेकमान्य लाेकाेत्सवासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाेलिस अधीक्षक, अप्पर पाेलिस अधीक्षक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, राज्यस्तरीय समितीचे सदस्य अशा सात सदस्यांची जिल्हास्तरीय समिती असणार आहे.

हे आहेत विषय
स्वदेशी,साक्षरता, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ- बेटी पढाअाे आणि जलसंवर्धन या पाच विषयांतील एक विषय निवडून स्पर्धेत भाग घेता येईल. स्थिर, हलता आणि सजीव देखावा अशा तिन्ही माध्यमांतून आरास करता येईल. पण त्यात लोकप्रबोधन आवश्यक आहे. टिळकांचा संदेश देणारी आरासही चालणार आहे.

अशी अाहेत बक्षिसे
तालुकास्तरावर: प्रथम २५ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय १० हजार
जिल्हास्तरावर : प्रथम लाख, द्वितीय ७५ हजार, तृतीय ५० हजार रुपये
विभागस्तरावर : प्रथम लाख, द्वितीय दीड लाख, तृतीय लाख रुपये
बातम्या आणखी आहेत...