आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांना तीन दिवस सुटी; ‘एटीएम’वर पडला ताण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे बँकांच्या ‘एटीएम’ केंद्रांवर मोठा ताण पडल्याने पैशाअभावी अनेक केंद्रे शनिवारी बंद होती. महिना अखेर बकरी ईद आणि गणपती विसर्जन सण आल्यामुळे एटीएम केंद्रातील पैसे झटपट संपले. संबंधित यंत्रणेकडून वेळेत पैसे भरण्यात आल्याने ग्राहकांची तारांबळ सुरू आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्या सुरू झाल्या. ते पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी पूर्णवेळ सेवा देत आहेत. पण चौथा शनिवार, बकरी ईद असे सलग तीन दिवस सुट्या होत्या. राष्ट्रीयीकृत बँकांच्या ‘एटीएम’मध्ये खासगी एजन्सीमार्फत रक्कम भरणा करण्यात येते. सुट्यांमध्ये अधिक रक्कम भरण्याची सोय करण्यात येते. तशा सूचना देण्यात येते. परंतु त्याचा अंमल होत नाही. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

खासगी बँकांची केंद्रे सुरू
अॅक्सिस,आयसीआयसीआय, एचडीएफसी, आयडीबीआय, आरबीएल या खासगी आणि व्यावसायिक बँकांची एटीएम केंद्रे सुरू आहेत. अर्ध्यावर शटर आेढलेली केंद्रे बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांची आहेत.

एजन्सीला सूचना
^सलग सुट्यांमुळे पैसे भरणाऱ्या एजन्सीला सतर्क राहण्याची सूचना केली. रकमेची व्यवस्था केली. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे काही एटीएम केंद्रे बंद असतील. संजय वाघ, उपव्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय