आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुर्डूवाडी टोलनाक्यावर ट्रकच्‍या धडकेत शिक्षकांचा मृत्यू; विद्यार्थी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 माढा (सोलापुर)- कुर्डूवाडी टोलनाक्यावर झालेल्‍या अपघातात शिक्ष‍काचा मृत्‍यू होऊन विद्यार्थी जखमी झाल्‍याची घटना मंगळवारी  दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली. एसटी बस चालकाने अचान‍क गाडी थांबल्‍याने हा अपघात घडला. 

या अपघातात राहुल श्रीधर भोरे (रा.भोसरे) हे प्राथमिक शिक्षक जागीच ठार झाले आहेत. राहुल भोरे हे भांबुरे वस्ती येथे गत पाच वर्षांपासुन शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. शाळा सुटल्‍यानंतर ते भोसरे येथील त्यांच्या घराकडे जात असताना कुर्डूवाडी टोलनाक्यावर हा अपघात घडला. बस अचानक थांबल्‍याने भोरे हे जागीच थांबले मात्र मागे असलेल्‍या ट्रकचे ब्रेक न लागल्‍याने दुचाकीला जोराची धडक बसली आणि यात भोरे हे जागीच ठार झाले तर सोबत असलेला 14 वर्षीय विद्यार्थी अमर अर्जुन डिकोळे जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्‍यात आले आहे. राहुल भोरे हे (शिक्षक) मराठा सेवा संघाचे तालुका सचिव पदावर कार्यरत होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
 
पुढील स्‍लाईडवर पहा अन्‍य फोटो...
बातम्या आणखी आहेत...