आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळाला पाण्याचा आॅडिट रिपोर्ट, २९ % गळतीवर शिक्कामोर्तब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- केंद्रसरकारने देशात सहा शहरांत पाण्याचे आॅडिट केले असून बंगळुरूच्या सीडीसी स्मिथ संस्थेचा अहवाल सोलापूर महापालिकेला प्राप्त झाला आहे. २०१३-१४ मधील पाणीपुरवठ्याच्या माहितीवरून २९ टक्के पाणी गळती तर २७ टक्के आकारणीतील तफावत आढळली आहे.
शहरातील पाण्याचे आॅडिट होत नाही अशी ओरड अधूनमधून होत असते. त्यामुळे तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शहरातील पाण्याचे आॅडिट व्हावे, यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार २०१३-२०१४ मधील माहितीच्या आधारे सोलापुरातील पाणीपुरवठा विभागाकडून पुरवण्यात येणारे पाण्याचे आॅडिट करण्यात आले आहे. उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी अहवालात तीन टप्प्यांत अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत.

दरडोई११० लिटर पाणी मिळेल
पाण्यापासूनमिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाय शोधत असताना पाण्याची गळती रोखता येईल. त्यातून शहरात प्रतिमाणसी ७० ऐवजी ११० लिटर पाणी रोज देता येईल. ४५ एमएलडी पाण्याची चोरी रोखता येईल, असे सीडीसी कंपनीने अहवालात नमूद आहे.

१६कोटींची तूट
पाणीपुरवठ्यातूनमहापालिकेस सन २०१४-१५ मध्ये ४४.१७ कोटी उत्पन्न मिळाले तर खर्च ६० कोटी रुपये झाले. चालू आर्थिक वर्षात मनपाला पाणीपुरवठ्यातून ६२ कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. सुधारित अंदाजपत्रकानुसार पाणीपुरवठा विभागात १६ ते १७ कोटी तूट अपेक्षित आहे.

एकूण उत्पन्न
४३%
असे मिळते उत्पन्न
एकूण उत्पन्न
९.५%
मिटर असलेल्या पाण्यापासून
३३.५% मीटर नसलेल्या पाण्यापासून
२९% गळती आणि अनधिकृत नळजोडमुळे
१७% मिटर असलेल्याचे िबल
५७%
१०%पाण्याचे मिटर नसल्याने

असे बुडते उत्पन्न
सीपीसी स्मिथ या कंपनीकडून पाण्याच्या उत्पन्नाचा आॅडिट िरपाेर्ट मिळाला आहे. १०० टक्के मीटर पद्धत अवलंब करण्याचा मुख्य मुद्दा त्यात आहे. तो सभागृहाकडे सादर करण्यात येईल. आर.एन. रेड्डी, उपअभियंता, मनपा पाणीपुरवठा विभाग

देशातील या शहरांच्या पाण्याचे झाले आॅडिट
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघासह सोलापूर, छिंदवाडा, पुरी, कुरूक्षेत्र, हरिद्वार या सहा शहरांच्या पाण्याचे उत्पन्न आॅडिट करण्यात आले.

२००८ मध्ये झाले होते आॅडिट
सन२००७ - ०८ मध्ये शहरात पाणी गळतीचे आॅडिट झाले होते. तेव्हा ४४ टक्के पाण्याची गळती असल्याचे स्पष्ट झाले होते. पाण्याच्या गळतीपेक्षा उत्पन्नातील गळती ५७ टक्के इतकी आहे.

काय आहेत उपाय
िदसणारीगळती बंद करणे, अनधिकृत नळ शोधणे, गळतीच्या माहितीसाठी पथक, लोकांना पाण्याचे महत्त्व सांगणे, सर्वच मिळकतींना मीटर बसवणे, संगणकीय यंत्रणेचा अवलंब, पंप हाउस येथे पाण्याचे मीटर बसवणे, पंप हाउस येथे वीज बचतसाठी मीटर बसवणे

ग्राह्य प्रमाणापेक्षा तिपटीने गळती
साधारणपणेपाणी वितरणात १८ टक्क्यांपर्यंत गळती ग्राह्य धरण्यात येते. साेलापुरात गळतीचे २९ टक्के तर आकारणीत २७ टक्के तफावत आहे. ही तफावत दूर करणे आवश्यक आहे.
उत्पन्न वाढवण्यासाठी अपेक्षित खर्च पुढीलप्रमाणे

पुढे काय?
केंद्रसरकारकडून आलेला अहवाल मान्यता आणि माहितीस्तव महापालिका सभागृहाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे टप्प्याटप्प्याने निधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार.