आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाटला पैठणी सेंटरमध्ये चोरी; सुमारे 9 लाखांचा ऐवज लंपास; मजले चढून दोघांनी डाव साधलाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- भवानी पेठेतील चाटला पैठणी सेंटरमध्ये चोरीची घटना घडली. दोन चोरटे संरक्षक भिंतीवरून दुसऱ्या मजल्यावर अाले. तेथून शिडीच्या सहायाने शेजारील दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर अाले. दुकानाची इमारत साधारण १५ फूट उंच अाहे. टेरेसवरील लोखंडी शटर उचकटून खाली दुकानात शिरले. काऊंटरवरील लोखंडी लाॅकर तोडून सुमारे नऊ लाखांच्या अासपास पैसे दागिन्यांची चोरी झाली. या चोरीचा काही भाग सीसीटीव्हीत (भिंतीवर चढतानाचा) कैद झाला आहे. दुकानातील सीसीटीव्ही मात्र बंद असल्यामुळे अातील चोरट्यांच्या हालचालीचे चित्रीकरण झाले नाही. शेजारील नागरिक, दुकानमालक, पेट्रोलिंग करणारे पोलिस यांच्या नजरेस ही घटना पडली नाही. मुख्य म्हणजे दुकान रस्त्याला लागूनच अाहे.


लक्ष्मीकांत व्यंकटेश चाटला (रा. भवानीपेठ, सोलापूर) यांनी जोडभावी पोलिसात तक्रार दिली अाहे. गुरुवारी शुक्रवारी असे दोन दिवस साडी विक्रीतून सात लाख ८३ हजार रुपये जमले होते. ते पैसे तीन तोळे सोन्याची अंगठी चोरांनी नेली. शटर अातून लाॅक होते. शनिवारी सकाळी चाटला हे दुकान उघडण्यासाठी गेले. कुलूप काढून शटर काढताना उघडत नव्हते. 

 

फायरवाॅटरप्रूफ लाॅकर अाणि दुसऱ्यांदा चोरी
चाटला पैठणी साडी सेंटर पाच-सहा वर्षांपूर्वी सुरू झाले. चार वर्षांपूर्वी याच दुकानात चोरी झाली होती. पाच लाख रुपयांचा एेवज गेला होता. त्याचा तपास अजून झाला नाही. अाज पुन्हा चोरी झाली. मोठे जाडजूड लाॅकर अाहे. तीन-चार जणांना ते उचलत नाही. मुख्य म्हणजे फायर वाॅटरप्रूफ लाॅकर अाहे. चोराने लोखंडी लॉकर पारीने फोडले. परगावी गेल्यामुळे बँकेत पैसे भरता अाले नव्हते, अशी माहिती व्यंकटेश चाटला यांनी िदली. 

 


चोराचा मोठा ‘प्रताप’च 
चाटलायांच्या दुकानाशेजारीच नातेवाइकांचे घर अाहे. त्यांच्या संरक्षक भिंतीवरून चोरटे दुसऱ्या मजल्यावर अाले. त्या ठिकाणी शिडी होती. त्याचा फायदा घेत दुकानाच्या टेरेसवर अाले. शटर उचकटून खालच्या मजल्यावर येऊन काऊंटरजवळील लोखंडी लाॅकर पारीने उचकटून बाजूला काढले. दुकानातील काही साड्या अस्ताव्यस्त टाकल्या. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला. श्वानपथक अाले, पण अातील जिन्यावरच घुटमळले. ठसेही घेतले अाहेत. पहाटे तीनच्या सुमाराला चोरटे दुकानात अाले अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...