आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाखाचा ऐवज चोरणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आयुर्वेदिक औषध विकणाऱ्या महिलेने घरात येऊन एक लाख ३८ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले. हा प्रकार १० जून रोजी घडला. दरम्यान पोलसांनी तातडीने यातील संशयिताला अटक केली. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जयश्री बाळासाहेब चुंगे (वय ५५, रा. उज्ज्वला सोसायटी, मुरारजी पेठ) यांच्या घरी बेबीनाज शेखलाल (रा. संभाजीनगर, कोल्हापूर) ही महिला आयुर्वेदिक सिरप विकण्यास आली. दरम्यान, जयश्री यांना फोन आला म्हणून त्या घराबाहेर जाऊन बोलल्या. तेवढ्यात बेबीनाज या महिलेने कपाटातील सोन्याची चेन, कर्णफुले, हिऱ्याचे पेंडल, कानातील फुले, अंगठ्या असा ऐवज लंपास केला. याबाबत जयश्री यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
छळप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
माहेरूनदहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावून शारीरिक मानसिक छळ करून दागिने, शैक्षणिक कागदपत्रे काढून घेऊन घरातून हाकलून देण्यात आले. याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भाग्यश्री अमोल वडणे (वय २३, रा. माळी गल्ली, शिंदे चौक) या विवाहितेला दिवाळीला बोलावण्यासाठी तिचे वडील सासरी मुंबई येथे आले. सासरच्या मंडळींनी त्यांना शिवीगाळ करून मोबाइल काढून घेतला. तसेच दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. विवाहितेच्या गळ्यातील तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले, तसेच तिचे शैक्षणिक कागदपत्रे काढून घेऊन शारीरिक मानसिक छळ केला. हा प्रकार ३१ मे २०१३ रोजी घडला. याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून वनमाला आनंद वडणे, दीपमाला आप्पाराव पाटील, अमोल आनंद वडणे यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकलाखाचे दागिने पळवले
पुण्याहून सोलापूरला आल्यानंतर रिक्षात बसून घरी जात असताना अज्ञात चोराने पॅन्टच्या खिशातून लाख १० हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची डबी पळवली. हा प्रकार १५ मे २०१६ रोजी घडला. शिवाजी गेनदेव काकडे (वय ५२, रा. तळेगाव, पुणे) हे रेल्वेने सोलापूरला आल्यानंतर स्टेशन बाहेर रिक्षात बसून जात असताना पॅन्टच्या खिशात ठेवलेली दागिन्याची डबी अज्ञात चोराने लंपास केली. याबाबत काकडे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दिली.

एसटीतून दागिने लंपास
मोहोळते सोलापूर असा एसटीने प्रवास करत असताना शेजारी बसलेल्या मुलाने महिलेच्या पर्समधील ४५ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संध्या बाळासाहेब सोनवणे (वय ५२, रा. बापूजी नगर) हे १० जून रोजी मोहोळ ते सोलापूर असा एसटीचा प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली. त्यांच्या बाजूला बसलेल्या मुलाने त्यांच्याकडील पर्समधून ४५ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. सोनवणे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पाचहजारांची फसवणूक
बॅँकेतपैसे जमा करायचे आहेत अशी थाप मारून एटीएम नंबर मिळवला. नंतर पाच हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. हा प्रकार २७ फेब्रुवारी रोजी घडला. संदीप शिवाजी सोलनकर (वय ३३, रा. एनजी मिल चाळ) यांच्या मोबाइलवर २७ फेब्रुवारी रोजी (९८२१६९८३४५) या क्रमांकावरून फोन आला. समोरून तुमच्या अॅक्सिस बॅँकेच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करायचे आहेत. तुमचा एटीएम कार्ड नंबर सांगा, असे विचारून त्या खात्यातील पाच हजार रुपये काढून घेतले. त्या रकमेतून वोडाफोनचे बिल खात्यावर जमा करून घेतले. याबाबत संदीप यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

दुचाकीवर क्रमांक बनावट
बनावटक्रमांक लिहून दुचाकी वापरल्याने संशयित आकाश मधुकर गदगे (वय २२, रा. साखर पेठ) पुरुषोत्तम प्रकाश गुत्तीकोंडा (वय २५, रा.घांेगडे वस्ती) यांना अटक झाली. रात्री पार्क चौकात गस्त घालत असताना दोघे संशयास्पद स्थितीत आढळून आले. अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडील दुचाकी गुन्ह्यातील असल्याचे आढळले.
बातम्या आणखी आहेत...