आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनगावकर आले तरी थांबेनात चोऱ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - "गुन्हेगारांनो पळा,सेनगावकर आलेत' असा इशारा पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी रुजू होताच दिला होता. ते येऊन पाच महिने झाले तरी शहरातील चोऱ्या, घरफोडी, मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना कमी होताना दिसत नाही.
पोलिस असल्याचे सांगत दोघांनी लुटले
पोलिसअसल्याचा बनाव करून सिद्धेश्वर पेठेतून पायी जाणाऱ्या चन्नवीर स्वामी (रा. होटगी) यांच्याजवळील दोन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळे लॉकेट दोघा तरुणांनी पळवले. दागिने काढून ठेवत असताना रूमालात बांधून देण्याचा बहाणा करून दागिने घेऊन पळाले. जेल रोड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचारला ही घटना घडली आहे.
करंजकर सोसायटीत चार तोळे दागिन्यांची घरफोडी
शेळगीतीलकरंजकर सोसायटीत राहणारे सुनील कळसकर यांच्या घरात चोरी झाली आहे. अर्धा तोळे कर्णफुले, दोन तोळे मंगळसूत्र, एक तोळे सोनसाखळी, अर्धा तोळे अंगठी, तीस हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला आहे. सुनील यांचे घर दुमजली आहे. पहिल्या मजल्यावर ते झोपले होते. दुसऱ्या मजल्यावरील दाराचा कडीकोयंडा उचकटून कपाटातील दागिने चोराने नेले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी सहाला उघडकीस आली. जोडभावी पोलिसात फिर्याद दिली.

पोलिस असल्याचे सांगत दोघा चोरांनी चार तोळे दागिने पळवले
जुळेसोलापुरातील संतोष नगराजवळील जगदीश मंगल कार्यालयाजवळ क्राइम विभागाचे पोलिस असल्याचे सांगून दागिने लुटले. ही घटना मंगळवारी घडली. अनुराधा गोपाळ बेडर (रा. न्यू संतोष नगर) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पतीसह पायी जाताना दोघे तरुण त्यांच्याजवळ आले. पोलिस असल्याचे सांगत त्यांनी आयकार्ड दाखवले. त्यानंतर एक तोळ्याचे लॉकेट, अर्धा तोळे अंगठी, एक ब्रासलेट, अर्धा तोळे लेडिज अंगठी काढून घेऊन रूमालात गुंडाळून ठेवण्याचा बहाणा केला. गोपाळ बेडर यांच्याकडे रूमालाचं पुडके देण्याचा बहाणा करून दागिने घेऊन पळून गेले.