आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुस्त तपासामुळे थांबेनात चोऱ्या, दोन महिन्यांत घडलेल्या चोरींच्या घटनांवर दृष्टिक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागील तीन महिन्यांपासून शहर परिसरात सातत्याने घरफोडी अथवा मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडत आहेत. तपास मात्र नाहीच. नेमके चोरटे का सापडत नाहीत हेही गाैडबंगालच अाहे. चोरीची घटना घडल्यानंतर महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनतपासणी केली जाते. यात कुठे चोरटे सापडतात का? चोरांच्या मागावर राहण्यासाठी खास पथके पाहिजेत, खबऱ्याचे नेटवर्क पाहिजे. रेकाॅर्डवरील चोरांचे अपडेट पाहिजे. तरच चोरांचा कुठे मागमूस लागू शकतो. चोरी रोखण्यावर ठोस उपाय योजना हवी. डीबी स्टारने टाकलेला प्रकाश...
सातही पोलिस ठाण्यात डीबी पथक अाहे. त्यांच्याकडून तपास काही होत नाही. गुन्हे शाखेकडे गुन्हे उघडकीस अाणण्याची जबाबदारी असताना त्यांच्याकडून सक्षमपणे काम होताना दिसत नाही. पुणे, मुंबईच्या धर्तीवर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी खास पथके सोलापुरात नाहीत. गुन्हे शाखेचे उपायुक्त पद तीन महिन्यांपासून रिक्तच. सहायक अायुक्त, निरीक्षक, सहायक निरीक्षक, फाैजदार अाणि शंभरच्या अासपास पोलिस पथके असताना चोरटे हाती लागत नाहीत. काही किरकोळ गुन्हे उघडकीस अाणले अाहेत. पण मोठ्या चोऱ्या घरफोड्या, मंगळसूत्र चोरांची टोळी यांच्या हाती लागली नाही.

झाली चोरी, लाव नाकाबंदी
कुठेचोरी झाली की नाकाबंदीत वाहनांची तपासणी होते. पीयूसी नाही, लायन्स नाही, येनकेन कारणांमुळे दहा-पंधरा गाड्यांवर दंडात्मक कारवाई करून नाकाबंदीचे सोपस्कार पार पडते. चोरटे काही हाती लागत नाहीत. संशयित चोरटे हाती लागतील असा अाशावाद पोलिसांना असेल पण अातापर्यंतच्या नाकाबंदीत एक ही चोरटा हाती लागला नाही हे विशेष अाहे. उलट नाकाबंदीतच दुचाकीच्या डिक्कीतून एक लाख रुपये गुरुनानक चाैकात गेलेत. मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या अाहेत. शहरातील सोसायट्यांत गस्त वाढवण्याची गरज आहे.

पोलिसांचे नेटवर्क नाही, नागरिकांशी संवाद दुरावलाय
पोलिसांकडे तपासाचे नेटवर्क सक्षम नाही. गुन्हे शाखा अथवा डीबी पथकाकडे हे काम असते. खबऱ्यांसाठी खास निधीही पोलिसांना दिला जातो. नेटवर्क तयार करण्यात अपयश अाले. गुन्हे शाखेचे अधिकारी बदलले की कामही बदलते. शहरात काय घडमोडी होतात याची माहिती नागरिकांकडून मिळत नाही. पोलिसांमधील अंतर वाढल्यामुळे ही समस्या. नागरिकांसोबत संवाद वाढायला हवा.

नागरिकांनीही काळजी घ्यावी
चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिस तपास करीत नाहीत असा सूर नागरिकांचा असतो. पण, नागरिक महागडे दागिने, पैसे ठेवून घराबाहेर पडतात. मंगळसूत्र, दागिने घालून कुठेही ये-जा करतो. यावेळी अापण काळजी घेत नाही. चोरीनंतर मनस्ताप करून घेण्यापेक्षा उपाय शोधा. दागिन्यांसाठी बॅंकेत लाॅकर घ्या. माैल्यवान वस्तू जपा.

चोरांच्या मागावार अाहोत
सवाॅधीक घटना जुळे सोलापूर, फाैजदार चावडी हद्द, एमअायडीसी पोलीस अाणि जोडभावी भागात घडतात. पोलिस निरीक्षक यशवंत शिकॅ म्हणाले, सणांचा बंदोबस्त अाता संपला अाहे. अाता या घटनांवर लक्ष केंद्रीत करू. पोलिस निरीक्षक एन. बी. अंकुशकर म्हणाले, अाम्ही चोरांच्या मागावर अाहोत. लवकरच अनेक घटना उघडकीस येतील.

Áपोलिस असल्याचेसांगून लक्ष्मीबाई ठाकूर यांचे भय्या चाैकात सात तोळ्याचे दागिने पळवले.
Áअंत्रोळीकरनगरमध्येपायी जाताना उमा मुगळे यांच्या गळ्यातील पंधरा तोळ्याचे मंगळसूत्र पळवले.
Áडफरीनचाैकातवंदना भीमराव राऊत यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र पळवले.
Áकर्णिकनगरातअलकापटेल यांचे मंगळसूत्र पळवले
Áपोलिसअसल्याचेसांगत जुळे सोलापुरात प्रदीप देशपांडे यांचे दीड तोळ्याचीे सोनसाखळी नेली
Áनवीनअारटीअोजवळरिक्षातून जाताना नम्रता गायकवाड यांचे पाच तोळ्याचेे मंगळसूत्र नेले.
Áमुरारजीपेठेजवळनिशा गोडबोले यांचे एक तोळ्याचे मंगळसूत्र, महिला हाॅस्पिटलजवळ नगरच्या महिलेचे अडीच तोळे, पार्क चाैकात दोन तोळ्याचेे मंगळसूत्र हिसकावले.
Áविद्यापीठाचेबीसीयूडीसंचालक अार. वाय. पाटील यांच्या घरात सतरा तोळे दािगन्यांची चोरी
Áपार्कचाैकात(आंबेडकरचौक ) कल्याणसिंग भंडगे यांचे साडेतीन तोळ्याची सोनसाखळी नेली.
याशिवाय महावीर चाैकातील डाॅ. ठकार यांच्या घरात ६० तोळे, पुणे रस्ता केगावजवळ दीक्षित यांच्या घरात दरोडा, सात तोळ्याचेे दागिने, नवीन अारटीअोजवळ माजी महापाैर भीमराव जाधव यांच्या घरात ८० तोळे, प्रा. श्रीमती वजनम यांच्या घरातून ४० तोळे या घटना दीड वर्षापासून ते अलीकडील काळातील अाहेत. याशिवाय शंभराहून अधिक घटना चोरीच्या अाहेत. पाचशे तोळे दागिने गेल्याचे पोलिस दप्तरी नोंद अाहे. तसेच दुचाकी, मोबाइल पळवण्याच्या घटना वेगळ्याच आहेत. नवरात्र काळात परडी भरण्याचा बहाणा सांगत, सुवािसनी जेवणाचे आमंत्रण देत महिलांकडून दािगने पळवले.

अजून मुलीचे दागिने द्यायचे अाहेत
^जुना होटगी नाकाजवळ विकासनगरात माझ्या घरात २५ मे रोजी सतरा तोळे दागिने चोरीला गेले. तीन दिवसांवर मुलीचे लग्न होते. त्यापूर्वी ही घटना घडली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली, कालांतराने तपास थांबवल्याचे त्यांना कळविण्यात अाले. मुलीला लग्नाचे दागिने द्यायचे अाहेत. अरूणजाधव, विकासनगर

सीसीटीव्ही फुटेज वापर सक्षमपणे व्हावा
^चोरीच्याघटनांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा अाहे. एखादा घटनेत पोलिस फुटेज घेऊन सीडी तयार करून दोषाराेपपत्रासोबत न्यायालयात सादर करतात. हा पुरावा ग्राह्य मानला जात नाही. कारण कलम ६५ - प्रमाणे संबंधित व्यक्तीकडून तो पुराव सर्टिफाय करून घ्यावा लागतो. पोलिस तेच काम नेमके करीत नाहीत. म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयात सादर करावा लागतो. दुसरा मुद्दा चोरीच्या घटनांमध्ये नेत्रसाक्षीदार नसतो. मुद्देमाल रिकव्हरी होत नाही. झाली तरी अोळख परेड होत नाही, या मुद्यांवर अनेक केसेस निकाली निघतात. त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढतेय. अॅड.प्रियल सारडा, मुंबईउच्च न्यायालय