आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : अनेक शाळांत मुलींसाठी तक्रारपेटीच नाही, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : शालेय जीवनात मुलींना लैंगिक शोषण किंवा आपल्यासोबत कोणतेही अनुचित प्रकार घडत असल्यास त्याची तक्रार करण्यासाठी शाळेच्या परिसरात एक विशेष तक्रारपेटी ठेवण्याचा आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिला. मात्र बोटावर मोजण्याइतक्या शाळा सोडल्या तर शहरातील अन्य शाळांत या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. 
 
शाळा सुरू होऊन एक आठवडा संपला तरी अजून अनेक शाळांत या तक्रारपेटीचे स्थान आणि रूप पक्के झालेले नाही. त्यामुळे मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या या शाळा मुलींच्या संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या उपायोजनांत मनाचा विचार करण्यात मागासलेल्या असल्याची प्रचिती येते आहे. 
 
शाळेत किंवा शाळेच्या बाहेर मुलींसोबत विचित्र घटना घडतात. त्यांच्या पालकांना त्यांना स्पष्टपणे काही सांगता आले नाही, तर किमान त्यांना निनावी तक्रारी शाळेतील तक्रारपेटीत टाकून शिक्षकांना प्रशासनाला आपल्या सोबत नेमके काय घडते आहे? याची जाणीव करून देण्याचा मूळ हेतू यामागे आहे. मात्र जर या मूळ हेतूकडेच शाळांचे दुर्लक्ष होत असेल तर मुलींच्या संरक्षाणाचे आणि त्यांच्या मानसिक संतुलनाचे संगोपन कसे होणार? हा प्रश्न आहे. 
 
२०१३ मध्ये या बाबत एक वेगळा आदेश शिक्षण विभागाने काढला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विशेष आदेश काढून ज्या शाळांत मुली आहेत, अशा मुलींना आपल्या तक्रारीकरिता तक्रारपेटीत टाकून सांगता याव्यात म्हणून हा आदेश काढण्यात आला आहे. मात्र २०१३ च्याही आणि २०१७ च्याही आदेशाला काही शाळांनी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी बाजूला ठेवले आहे. त्यामुळे यावर नियंत्रण कोण ठेवणार? असा प्रश्न उभारला आहे. 
 
विद्यार्थिनी म्हणतात... 
आता स्वंतत्र परिपत्रक पाठवू 
-गेल्या आठवड्यात मी अनेक विषय असलेले एक परिपत्रक पाठवले आहे. मात्र ते अद्याप गेले नसेल. तरीही आता एक वेगळे तक्रारपेटीचे स्वतंत्र परिपत्रक पाठवू. त्यावर काम करू. सत्यवान सोनवणे, शिक्षणाधिकारी 
 
मुलींच्या मानसिकतेचा विचार करा 
-मुलींच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्या वयात जाऊन विचार करा. मात्र जर शासन काही वेगळे उपक्रम घेऊन विद्यार्थिनींनी पाठिंबा देणार असेल तर त्याची नीट अंमलबजावणी व्हायला नको का? ती होणे गरजेचे आहे. त्यानून मुली आपल्या शाळेत गेटमध्ये अथवा वर्गात जे काही चुकीचे सुरू असेल त्यावर लगाम लावू शकतील. याचा विचार होणे गरजेचे आहे.” परमेश्वर शिंदे, पालक (नाव बदललेले) 
 
आमच्या शाळेत नाही 
-आमच्या शाळेत पारंपरिक उपक्रम होतात. मात्र असले काही ऐकले नाही. ही संकल्पना छान आहे. विशेषत: जे काही बोलायचे आहे, ते गुप्तपणे. त्यामुळे जे काही घडणार आहे. ते मोकळेपणाने मांडता येणार आहे. त्यामुळे आमच्यासोबत काही घडलेच तर आम्ही लगेच आवाज उठवू.” सृष्टी,आठवी (बदललेले नाव) 
 
तक्रार पेटी सोडा, नावच नाही 
आमच्याशाळेत सोयी-सुविधा आहेत. मात्र जर का मुलींच्या बाबतीत काही घडलेच तर त्याची वाच्यता करण्यासाठी तक्ररपेटी नाही. गावातल्या काही शाळांमध्ये तक्रारपेटी असल्याचे मैत्रिणी सांगतात तेव्हा वाटते की, त्यांच्या शाळांना विद्यार्थिनींची काळजी आहे. मात्र आमच्या शाळेत पेटीचे नावही नाही.” साक्षी,सातवी (बदललेले नाव) 
 
शहरात १२५ शाळा 
शहरात अनुदानित आणि विनाअनुदानित अशा १२५ शाळा आहेत. तर जिल्ह्यात हजार ६९ माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळांत तब्बल लाखाच्यावर विद्यार्थिनी शिक्षण घेतात. त्यात सातवीनंतरच्या विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या निर्णयाच्या संदर्भात शिक्षणाधिकारी आणि शाळाही उदासीन आहेत. 
 
अशी आहे प्रक्रिया 
विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारी मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलिस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासमोर उघडण्यात येणार आहेत. संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारींसाठी पोलिस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. अशा तक्रारींचे निवारण शाळा व्यवस्थापन स्तरावर करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्येक समस्या विद्यार्थ्यांना निर्भीडपणे मांडता येईल. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही.
 
विचारले की, बॉक्स तयार 
अचानक कुणी विचारले आणि भेट दिली तर कार्यालयात पेटी आहे. मुली तक्रार करत नाहीत म्हणून आत ठेवला आहे, असे सांगतात वास्तविक त्या तक्रारपेट्या या बाहेरच्या दिसण्यासारख्या दिशेला असायला हव्यात आणि तिथ मुलींनी जाण्यात कोणतीही अडचण होऊ नये, असे वातावरण असावे. त्या चिठ्ठ्या शाळेचे व्यवस्थापन ठरवेल तो वाचून त्यावर कारवाई केली जावी, असे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. 
 
या शाळांत आहेत नियमित तक्रारपेट्या 
काही प्रमुख शाळांचा अपवाद वगळता बहुतांश शाळांत तक्रारपेटी नाही. इंडियन मॉडेल स्कूल, जैन गुरुकुल, सेवासदन प्रशाला हरिभाई देवकरण प्रशाला आणि भु. म. पुल्ली कन्या प्रशाला अशा शाळांत मुलींच्यासाठी तक्रारपेटी आहे. त्यात मुली आपल्या तक्रारीही टाकतात. मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. 
 
आपल्या प्रतिक्रिया : तुमची पसंती नावासह ९२०००१२३४५ याक्रमांकावर एसएमएस करा. 
 
बातम्या आणखी आहेत...