आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय लघुपटात ‘बंद मूठ’ तिसरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोलकाता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात सोलापूरच्या कलावंतांचा ‘बंद मूठ’ तिसरा आला. ४०० लघुपटांमधून त्याची निवड झाली. परंतु दुर्दैव असे की, पैशाअभावी येथील कलावंत जाऊ शकले नाहीत. संयोजकांनी कुरिअरद्वारे पारितोषिके पाठवली. 
येथील उदयोन्मुख कलाकारांनी ‘एकी प्रॉडक्शन’ या बॅनरखाली ‘बंद मूठ’ची निर्मिती केली. १० मिनिटे १६ सेकंदांच्या या लघुपटात कलावंत आहेत. कवी अनिल पवार यांनी घर गहाण ठेवून हा लघुपट कोलकात्याच्या महोत्सवात नेला. त्याचा बहुमान झाला. परंतु तो पाहण्याची संधी कलावंतांना मिळाली नाही. याबद्दल खंत वाटते असे निर्माते संतोष चव्हाण म्हणाले. 

११ हजार रोख पारितोषिक आणि हजारांचे उत्कृष्ट पटकथा लेखन पुरस्कार मिळाले. चार हुतात्मा पुतळ्याच्या साक्षीने त्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. त्यानंतर जल्लोष केला. या वेळी अभिनेत्री गंगा खेडगीकर, संजय भोसले, संतोष चव्हाण, अनिल पवार, राहुल मस्के, सागर कांबळे, मल्लिनाथ सोरेगाव, सुनील खेडगीकर, बालकलाकार हृषीकेश खराडे आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...