आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसार उद्ध्वस्त, ताडी दुकानाच्या परिसरात तिसरा संशयास्पद मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मोदी येथील ताडी दुकानासमोर शनिवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. रात्रीच तो तिथे पडलेला असावा. सकाळी साडेसातच्या सुमारास त्याला उठवण्यासाठी त्याचा भाऊ गेला. परंतु त्याचा देह निपचित पडलेला होता. शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ताडी दुकानांच्या परिसरातील संशयास्पद मरणारी ही तिसरी व्यक्ती आहे.
१५ सप्टेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास न्यू पाच्छा पेठेतील ताडी दुकानात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी मोदी ताडी दुकान आणि केंद्रीय विद्यालयासमोरील दुभाजकावर एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता. या तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांत तक्रार केली नाही. शनिवारी सकाळी विलास सिद्राम माढेकर (वय २६, रा. मोदी शिंदीखाना) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याचा भाऊ प्रकाश माढेकर यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा पहिल्या, दुस-या व तिस-या घटनेविषयी...