आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक शाळांना यंदा मिळणार ७६ सुट्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील प्राथमिक शाळांच्या सुट्यांचे वेळापत्रक महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. त्यात एकूण ७६ सुट्यांचा समावेश आहे. शिवाय, रविवारच्या ५२ सुट्या आहेतच. यंदा दिवाळीची सुटी १३ दिवसांची तर मकर संक्रांतीची सुटी तीन दिवसांची आहे. शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी हे वेळापत्रक जाहीर केले आहे.
वर्षभराच्या सुट्यांमध्ये विविध सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी अशा ७६ शासकीय सुट्या, तसेच रविवारच्या ५२ दिवस सुट्या आहेत. त्यामुळे वर्षभरात २३८ दिवस शाळा चालणार आहेत. विशेष म्हणजे शनिवार, सोमवार आणि रविवारला जोडून सुट्या या वर्षात मिळणार आहेत. ५२ रविवारपैकी येत्या वर्षातील मे रविवारी आल्याने शिक्षकांची एक सुटी बुडाली आहे. त्यानंतर मे ते १७ जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्या असतील.

सुट्या अशा आहेत
१८ जुलै शनिवार (रमजान), २७ जुलै सोमवार (आषाढी), १५ ऑगस्ट शनिवार (स्वातंत्र्य दिन), १८ ऑगस्ट मंगळवार (पारसी नववर्षदिन), १९ ऑगस्ट बुधवार (नागपंचमी), सप्टेंबर सोमवार (शेवट श्रावणी सोमवार), १७ सप्टेंबर गुरुवार (गणेश चतुर्थी), २१ सप्टेंबर सोमवार (गौरी विसर्जन), २४ सप्टेंबर गुरुवार (बकरी ईद), ऑक्टोबर गुरुवार (महात्मा गांधी जयंती), १३ ऑक्टोबर मंगळवार (घटस्थापना), २२ ऑक्टोबर गुरुवार (दसरा), २४ ऑक्टोबर शनिवार (मोहरम), नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर (दिवाळी), २५ नोव्हेंबर बुधवार (गुरुनानक जयंती), २४ डिसेंबर गुरुवार (ईद मिलाद), २५ डिसेंबर शुक्रवार (नाताळ), १४ जानेवारी ते १६ जानेवारी २०१६ (मकर संक्रांत), २६ जानेवारी मंगळवार (प्रजासत्ताक दिन), १९ फेब्रुवारी शुक्रवार (शिवाजी महाराज जयंती), मार्च सोमवार (महाशिवरात्री), २४ मार्च गुरुवार (धुलिवंदन), २५ मार्च शुक्रवार (गुड फ्रायडे), २८ मार्च सोमवार (रंगपंचमी), एप्रिल शुक्रवार (गुढीपाडवा), १४ एप्रिल शुक्रवार (आंबेडकर जयंती),१५ एप्रिल शुक्रवार (रामनवमी), १९ एप्रिल मंगळवार (महावीर जयंती), मे रविवार (महाराष्ट्र दिन).
सुट्यांचे नियोजन जाहीर
- चालू शैक्षणिक वर्षासाठी ७६ सुट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सुट्याचे नियोजन असेल. शासनाच्या आदेशानुसार मागील वर्षाप्रमाणे ७६ सुट्या आहेत. त्यांची अमंलबजावणी जुलैपासून सुरू झाली आहे.”
विष्णू कांबळे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ
बातम्या आणखी आहेत...