आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा दहा दिवसांचा नवरात्रोत्सव, दुपारी दीडपर्यंत करा घटस्थापना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंदा 1 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवास सुरुवात होत असून पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापना करता येईल. यावर्षी घटस्थापनेपासून ११ व्या दिवशी दसरा असून यापूर्वी अनेकदा असे झाले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा कितव्याही दिवशी आला तरी शुभच असतो, असे पंचांगकर्ते आेंकार मोहन दाते यांनी सांगितले.
श्री. दाते म्हणाले, “नवरात्र उत्सवात काही घरांमध्ये नवरात्रीच्या माळा घेण्याची पद्धत आहे. सर्वसाधारणपणे नऊ माळा घेतल्या जातात. मात्र या वर्षी नवरात्रोत्थापनेचा दिवस दहावा असल्याने रोजची एक याप्रमाणे नऊ ऐवजी दहा माळा घालाव्यात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शक्ती देवीची जी उपासना केली जाते त्याला नवरात्र असे म्हणले जाते. हे दिवस तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे कमी अधिक होत असतात. या वर्षी घटस्थापनेपासून ११ व्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी १९९८ मध्येही असे झालेले होते. त्यामुळे शुभ किंवा अशुभ अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचणींमुळे (अशौच) एक आॅक्टोबरला घटस्थापना करणे शक्य नसणाऱ्यांनी चार, सहा किंवा आठ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी. दहा ऑक्टोबरला नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) करावे.”

दसरा ११ ऑक्टोबरला
महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 9 ऑक्टोबरला मध्यरात्री मिळते. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. दुर्गाष्टमी ऑक्टोबरला आहे. विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे ११ ऑक्टोबरला असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दुपारी दोन वाजून २३ मिनिटे ते तीन वाजून १० मिनिटांपर्यंत आहे.
बातम्या आणखी आहेत...