आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नपत्रिकेवर महापुरुषांचे विचार, तुकोबांचे अभंग, मुली वाचवण्याची साद!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नपत्रिकेत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग वाचयाला मिळतात. पत्रिका २० पानांची आहे. - Divya Marathi
लग्नपत्रिकेत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग वाचयाला मिळतात. पत्रिका २० पानांची आहे.
माढा- महागड्या लग्नपत्रिका हा सध्या प्रतिष्ठेचा विषय. मात्र, माढ्यातील एक लग्नपत्रिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ती तब्बल २० पानी आहे. लग्नपत्रिकेवर महापुरुषांचे विचार, प्रबोधनात्मक लेखमाला, तुकोबांचे अभंग आणि मुली वाचवा हा संदेशही आहे. केवळ रुपयात पंचफुला प्रकाशनाने बनवलेली ही लग्नपत्रिका संग्रही असावी अशीच आहे. 

माढ्यातील ऋतुजा दिनेश जगदाळे तांबवेच्या (ता.माढा) कुलदीप हनुमंत खटके यांचा विवाहसोहळा माढ्याच्या श्रीरामनगर भागात होणार आहे. ऋतुजा कुलदीप या दोघांवरही पुरोगामी विचारांचा प्रभाव आहे. ऋतुजाचे वडील दिनेश जगदाळे हे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आहेत, तर कुलदीपचे घराणेही मराठा सेवा संघाच्या विचारांशी संलग्न आहे. 

मुली वाचवा या संदेशासह तुकाराम महाराजांची गाथा, महापुरुषांचे कार्य चरित्र लग्नपत्रिकेतून मांडले आहे. पुस्तकरूपी ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

अशाच लग्नपत्रिका छापाव्यात 
लग्न पत्रिकाही आठवणीत राहणारी गोष्ट आहे. मात्र, त्या कचराकुंडीत जातात. त्यामुळे आमची ही पुस्तकरूपी पत्रिका पाहून इतरांनीही अशाच पत्रिकांसाठी पुढाकार घ्यावा. 
- ऋतुजा दिनेश जगदाळे, वधू 

शिवविवाह 
ऋतुजाकुलदीपचा विवाह धार्मिक प्रथा, कर्मकांड नाकारून होणार आहे. महापुरुषांचे प्रतिमापूजन तसेच तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचे वाचन करून, सामाजिक उपक्रम राबवून हा शिवविवाह सोहळा उत्साहात पार पडणार आहे. 

बळीराजाचा गौरवशाली इतिहास 
पुस्तकरूपी लग्नपत्रिकेत जिजाऊवंदना, मुली वाचवा हा संदेश आहे. हृदयस्पर्शी कविता, तुकाराम महाराजांच्या अभंगगाथा यासह बळीराजाचा गौरवशाली इतिहास, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांची हत्या आणि गुढीपाडवा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यासह अन्य विषयांवरील विचारवंतांचे लेख आहेत.  

सामाजिक, ज्वलंत विषय असावेत 
ऋतुजाने मलाही लग्नपत्रिकेची कल्पना सांगितली. मलाही ती खूप आवडली. त्यामुळे होकार दिला. सामाजिक, ज्वलंत विषयावर प्रबोधन करणारी लग्नपत्रिका छापण्यास तरुणाईने पुढे यायला हवे. 
- कुलदीप खटके, वर 
बातम्या आणखी आहेत...