आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदयद्रावक घटना: पहाटे फोनवरून अपघाताचे वृत्त कळाले नि ठोका चुकला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तळे हिप्परगे येथे झालेल्या आपघातानंतर सिव्हिल येथे शोकाकुल माळगे परिवार. - Divya Marathi
तळे हिप्परगे येथे झालेल्या आपघातानंतर सिव्हिल येथे शोकाकुल माळगे परिवार.

सोलापूर- पहाटे साडेतीन-चार वाजले असतील. घरी फोन अाला... गुमडेल बोलताय काय..? होय म्हणताच, पलीकडून पोलिसांचा अावाज अाला.... शासकीय रुग्णालयात या... मुलाचा अपघात झालाय. हदयाचे ठोके चुकले, मी घाबरलोच. तत्काळ शासकीय रुग्णालयात अालो अन् पाहतो तर मुलगा समोरच अपघातग्रस्त झाला होता. सांगत होते जयंत गुमडेल. मुलगा दीपक अभ्यासात हुशार होता. शनिवारी रात्री एकत्र जेवण करून नऊला अभ्यासाला गेला अन् सकाळीच हा प्रसंग समोर अाला. 


अशीच काहीशी स्थिती माळगे परिवाराची होती. अाई, बहिणी, वडील व्याकुळ होते. बहिणींचे रडणे थांबत नव्हते. अासबे यांचे वडील तर खिन्न मानाने बसून होते. काय बोलावे, करावे सुचत नव्हते. सगळेजण त्यांना धीर देत होते. हा प्रसंग अनेकांच्या मनाला वेदना देणारा होता. 


खूप अभ्यास करायचे

चौघेजण रात्रभर खूप अभ्यास करायचे. रात्री चहाला गेले. सकाळी अपघाताचे वृत्त अाले. सगळ्यांना एकदम शाॅकच बसला. काही दिवसांपासून पाहात होतो अाम्ही. अगदी मन लावून अभ्यास करायचे. अशा अाठवणी तिघांच्या मित्रांनी शासकीय रुग्णालयात सांगितल्या. काही दिवसांपूर्वी काॅलेज ड्रेस डे झाला होता. त्याचे फोटो पाहून अाठवणी जागवत होते. अगदी जीवलग, मदत करण्यात तत्पर, अभ्यास, हुशार मित्रांचा असा अंत व्हावा, हे मित्रांना पाहवत नव्हते. अनेकांचे डोळे भरून अाले होते. 


विद्यार्थ्यांना अपघाती विमा कवच 
सोलापूर विद्यापीठाने सर्वच विद्यार्थ्यांचा नाममात्र रकमेत दहा लाख रुपये अपघाती विमा कवच लागू केले अाहे. अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये वारसांना भरपाई म्हणून मदत मिळू शकते, अशी माहिती सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. सूर्यकांत शिंदे यांनी दिली. काॅलेजकडून अामच्याकडे प्रस्ताव अाल्यास मदत करण्यात येईल. 


मोबाइल लाॅक अन् दुचाकी ट्रॅकरची मदत 
अाॅर्किडकाॅलेजच्या एक दीड किलोमीटर अंतरावर दीपक गुमडेल, संगमेश माळगे, अक्षय अासबे, हेमंत थळंगे जखमी अवस्थेत होते. पहाटे तीनच्या सुमाराला एका व्यक्तीने हा अपघात पाहून रस्त्यावर दगड लावून वाहतूक बाजूने घेण्यास भाग पाडले. सोलापूर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर तेवढ्यात एक पथक येतच होते. चौघांचेही मोबाइल लाॅक असल्यामुळे नातेवाइकांना संपर्क करता येईना. गुमडेलच्या दुचाकी नंबरवरून ट्रॅकर सिस्टीमला एसएमएस केल्यानंतर नाव, पत्ता फोन नंबर मिळाला. फोन केल्यानंतर गुमडेल यांना घटनेची माहिती दिल्यानंतर अोळख पटली. अन्य तिघांच्या नातेवाइकांना माहिती िदल्यानंतर सगळेजण धावत अाले. जर मोबाइल लाॅक नसते तर संपर्क अधिक लवकर करता अाला असता. अथवा उपचार लवकर िमळाले असते तर अाणखी चित्र वेगळे राहिले. 


पालकमंत्री, प्राचार्य यांचीही भेट 
रुग्णालयात पालकमंत्री िवजयकुमार देशमुख यांनीही भेट देऊन नातेवाइकांचे सांत्वन केले. पोलिसांकडून अपघाताची माहिती जाणून घेतली. डाॅक्टरांना मदत करण्यासाठी सूचना दिल्या. उमद्या तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे तेही व्यथित झाले होते. अाॅर्किड काॅलेजचे प्राचार्य डाॅ. जे. बी. दफेदार हेही अाले होते. 

बातम्या आणखी आहेत...