आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन दुचाकींना चिरडले, तीन विद्यार्थी जागीच ठार; सोलापूरजवळ दुर्घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

सोलापूर- महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अभ्यास करत असताना मध्यरात्रीच्या सुमारास चहाची तलफ आल्याने दुचाकीने हॉटेलकडे निघालेल्या चार विद्यार्थ्यांपैकी तिघांचा अवजड वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. एक जखमी झाला. धडक देणाऱ्या वाहनाचा शोध लागला नाही. सोलापूर जिल्ह्यातील हगलूरजवळील एका ढाब्याजवळ ही दुर्घटना घडली.


परीक्षा जवळ आल्यामुळे येथील नागेश ऑर्चिड अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालयात रात्री  सुमारे १५० विद्यार्थी रोज अभ्यासाला येतात.  शनिवारी दीपक जयंत गुमडेल (२२), संगमेश मडोळप्पा माळगे (२०), अक्षय िवजय अासबे (२१) आणि  हेमंत बसवराज थळंगे (२१) हे मेकॅनिकल शाखेच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थीसुद्धा रात्री ग्रंथालयात अभ्यासासाठी गेले. मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास त्यांना चहाची तल्लफ आली. चौघेही दोन दुचाकींवरून हॉटेलकडे निघाले. हगलूरजवळील ढाब्याकडे जाताना मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले. यात तिघांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने बेशुद्ध पडले. तर, हेमंतला मुका मार लागला. आरडाओरड करूनही त्यांना कुणाचीच मदत मिळाली नाही.


दरम्यान, पहाटे ३ च्या सुमारास त्या मार्गावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने सोलापूर तालुका पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्याचवेळी गस्तीवरील पोलिसांचे वाहन तिथे आले आणि त्यांनी सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी दीपक, संगमेश आणि अक्षयला डॉक्टरांनी मृत घोषित केले.  

 

तिघेही एकुलते एक
या अपघातात मृत्युमुखी पडलेले तिन्ही विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील एकुलते एक मुले आहेत. जखमी हेमंत थळंगेवर उपचार सुरू आहेत. मागील पंधरवड्यात तुळजापूरजवळ एका अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. ते तिघेही कुटुंबातील एकुलतेच होते. 

बातम्या आणखी आहेत...