Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» Three Died In Sangola Solapur

बुडणाऱ्या मुलाला वाचवताना पित्यासह तिघांचा मृत्यू; सुदैवाने मुलगा बचावला

सांगोला तालुक्यातील वाकीशिवणी येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास बंधाऱ्यात पडलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 01:36 AM IST

  • बुडणाऱ्या मुलाला वाचवताना पित्यासह तिघांचा मृत्यू; सुदैवाने मुलगा बचावला
सोलापूर- जिल्ह्यातील वाकी शिवणे येथे अाेढ्याखालील बंधाऱ्यातील पाण्याच्या भाेवऱ्यात अडकलेल्या रामचंद्र चव्हाण याला वाचवताना त्याचे वडील खज्जू चव्हाण (वय ४५ वर्षे) यांच्यासह गावातील महादेव पांडुरंग कांबळे (वय ६० वर्षे) व सदाशिव पांडुरंग कांबळे (वय ५५) हे दाेन भाऊ बुडून मरण पावले. वाचवणारे इतर दाेघेही जखमी झाले अाहेत. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे रामचंद्रला वाचवण्यात यश अाले.

बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास रामचंद्र चव्हाण, अानंद अहिवळे व व्यंकटेश पवार ही मुले पाेहायला गेली हाेती. मात्र, पाण्याचा अंदाज न अाल्याने रामचंद्र पाय घसरून पाण्याच्या भाेवऱ्यात अडकला व ताे बुडू लागला. साेबतच्या मित्रांना अारडाअाेरड केल्याने परिसरातील लाेक मदतीसाठी धावले. रामचंद्रला त्याला वाचवण्यासाठी वडील खज्जू चव्हाण, गावकरी सदाशिव कांबळे, महादेव कांबळे हे सख्खे भाऊ, मुन्ना कुमार (रा. बिहार) पप्पू पाेपट चव्हाण, गजानन सदाशिव कांबळे अादींनी पाण्यात उड्या घेतल्या. यापैकी खज्जू, महादेव व सदाशिव हे बुडाले, तर मुन्ना कुमार व पप्पू चव्हाण हे गंभीर जखमी झाले अाहेत.
त्यांना उपचारासाठी साेलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले अाहे. वेळीच उपचार मिळाल्यामुळे गजानन चव्हाण याची प्रकृती सुधारली असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे रामचंद्रला वाचविण्यात यश अाले अाहे.

Next Article

Recommended