आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Hundred Doctors Are Available In Solapur For Ilizarov

'इलिझारोव्ह'साठी 300 अस्थिरोगतज्ज्ञ शहरात, अमेरिकासह इतर देशांतील डॉक्टरांची उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इलिझारोव्ह परिषदेचे उद्घाटन करताना रशियाचे डॉ. ब्लादिमीर शिव्हास्तोव्ह, अमेरिकेचे डॉ. युजीन, डॉ. संदीप आडके, डॉ. सौ. आडके, डॉ. एल. प्रकाश.)
सोलापूरः रशियन इलिजारोव्ह तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे शनिवारी सोलापुरात उद्घाटन झाले. या कार्यशाळेत इराक, रशिया, अमेरिका, मॉरिशससह विविध देशांतील सुमारे ३०० डॉक्टर सहभागी झाले आहेत. यामुळे सोलापूरच्या वैभवात भर पडल्याची भावना असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. के. पी. डागा यांनी व्यक्त केली.
रशियन इलिझारोव्ह सेंटर, सोलापूर ऑर्थेापेडीशियन सोसायटी, महाराष्ट्र ऑर्थोपेडीशियन असोसिएशन, आसामी इंडियन, आयएमए, ओसॅक आणि आडके हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी सरोवर येथे कार्यशाळा झाली. व्यासपीठावर रशियाचे डॉ. ब्लादीमीर शिव्हास्तोव्ह, अमेरिकेचे डॉ. युजीन, डॉ. संदीप आडके, डॉ. एल. प्रकाश, डॉ. लोणी आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूरला विमानसेवा नसताना विविध देशांतील अस्थिरोगतज्ज्ञ कार्यशाळेत येणे महत्त्वाची बाब असल्याचे डाॅ. संदीप आडके यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यशाळेच्या ठिकाणी मेडिकल आणि सर्जिकलसाठी लागणाऱ्या साहित्याचे ४० स्टॉल्स आहेत. बेस्ट संशोधन प्रबंधासाठी डॉ. ओमर अली, डॉ. भास्कराव राव यांचा गौरव झाला.
इलिझारोव्ह उपचार पद्धत
रशियन इलिझारोव्ह पद्धतीचा वापर करून जवळपास ८० टक्के फ्रॅक्चर सर्व अस्थिरोगांवर अत्यंत खात्रीपूर्वक विनाचिरफाड किंवा दोनच टाक्यात, ब्लडलेस, व्रणरहित शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. वाकडी हाडे, हाडातील इन्फेक्शन, हाता-पायांचे, लहान मुलांचे मणक्यांचे अस्थिविकार, गुडघेदुखीवरील गुडघा बदलता करावयाचे अद्ययावत उपचार, फिजीओथेरपी आदी विषयांवर चर्चासत्रे झाली.