आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवेढ्याचे तीन पोलिस अटकेत; अवैध गुटखा वाहतुकीला मदत, आर्थिक तडजोडी केल्याचा ठपका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - अर्थिक तडजोडी करून गुटखा वाहतुकीला मदत करणारे मंगळवेढ्याचे पोलिस नाईक अमोल घोळवे, राहुल देवकते आणि महिला पोलिस सोनाली इंगवले या फरार संशयितांना पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सोमवारी अटक केली. पंढरपूर न्यायालयात तीन जणांना उभे केले असता त्यांना पाच नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
११ सप्टेंबर रोजी कर्नाटक येथून टेम्पोतून (क्रमांक एम. एच. १५ बी. जे. ७९८१) गुटखा येत असल्याची माहिती वरील तीन पोलिसांना मिळताच त्यांनी कात्रळ येथे महामार्गावर बॅरिकेड लावून टेम्पो अडवला. आर्थिक तडजोडीकरता तो रात्रभर थांबून ठेवला. तडजोडीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वरील तिघे अनवलीपर्यंत टेम्पो पोहचवण्यास गेले असता तो टेम्पो पंढरपूर पोलिसांनी पकडून गुन्हा दाखल केला होता.

इतर आरोपींचा तपास करणार:
अमोलघोळवे, राहुल देवकते आणि महिला पोलिस सोनाली इंगवले असे तीन संशयित पोलिस आरोपी गेले पावणेदोन महिने फरार होते. जिल्हा अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके शोध घेत होती. पंढरपूर परिसरात तिघे आल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांना मिळताच पोलिस पथकाच्या मदतीने त्यांना पकडण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...