आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघे तुरुंगातून बाहेर पडले; साथीदारांच्या मदतीने टाकले तीन दरोडे; टोळी अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- इंदापूर येथील एका गुन्ह्याप्रकरणी दोघेजण १८ महिने जेलमध्ये होते. एक महिन्यापूर्वी बाहेर अाल्यानंतर पाच मित्रांच्या मदतीने सोलापूर, नळदुर्ग उस्मानाबाद येथील महमार्गावर तीन दरोडे टाकले. पोलिसांनी सापळा रचून टोळीला अटक केली. अाॅगस्ट रोजी तांदूळवाडीजवळ ट्रकचालकाला अडवून ४५ हजार रुपये लुुटण्यात अाले होते. 

सूरज नवनाथ मुंडे (वय २०, उपळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) किशोर सुनील भोई (वय २४ कळशी, ता. इंदापूर), रोहित नवनाथ शिंदे (वय १९, रा. कळशी), योगेश रामलिंग ढाकणे (वय २०, रा. कोरेगााव, ता. बार्शी), परशुराम हरिश्चंद्र ढाकणे (वय २१, रा. कोरेगाव), अमोल शंकर खताळ (वय २५, रा. जामखेड, नगर), उमेश दगडू देवकते (वय २८, रा. करमाळा रोड, कुर्डुवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सूरज आणि उमेश १८ महिने जेलमध्ये होते. जेलमधून परतल्यानंतर कुर्डुवाडी येथे त्यांनी दरोड्याचा प्लॅन केला. अाॅगस्ट रोजी कादीर खान (रा. मुंब्रा, ठाणे) हे बारामतीच्या डायनॅमिक्स डेअरीचे साहित्य घेऊन हैदराबादला जात होते. तांदूळवाडीजवळ स्काॅर्पिअोतून आलेल्या सातजणांनी खान यांना मारहाण करून ४५ हजार रुपये काढून घेतले. सोलापूर तालुका पोलिसात तक्रार देण्यात अाली. नळदुर्ग पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्या भागातही असाच गुन्हा घडल्याची माहिती मिळाली. उस्मानाबाद भागातही त्याच दिवशी असा प्रकार घडला होता. या टोळीची माहिती काढण्याचे काम सुरू होते. चौकशीत सात जणांची नावे समोर आली. पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, फौजदार खतीब, हवालदार शेख, करे, गायकवाड, राऊत, साखरे, हंचे, जाधव या पथकाने केली. 

४५ हजार रुपये काढून घेतले. सोलापूर तालुका पोलिसात तक्रार देण्यात अाली. नळदुर्ग पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्या भागातही असाच गुन्हा घडल्याची माहिती मिळाली. उस्मानाबाद भागातही त्याच दिवशी असा प्रकार घडला होता. या टोळीची माहिती काढण्याचे काम सुरू होते. चौकशीत सात जणांची नावे समोर आली. पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, फौजदार खतीब, हवालदार शेख, करे, गायकवाड, राऊत, साखरे, हंचे, जाधव या पथकाने केली. 
बातम्या आणखी आहेत...