आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच ठिकाणांच्या लिलावातून २७ कोटींचा मिळाला महसूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा प्रशासनाने काढलेल्या वाळू लिलावात ३१ ठेकेदारांनी नोंदणी केली. प्रत्यक्षात बोलीमध्ये ११ जणांनी सहभाग घेतला. यापैकी फक्त जणांनी वाळू ठेके घेतले आहेत. या ठिकाणांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला २७ कोटी लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. उर्वरित ३२ ठिकाणचे लिलाव पुढील आठवड्यात काढण्यात येणार असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव-मुंढवी येथील वाळू ठेका रघुनाथ नागणे यांनी कोटी ७१ लाख, गंुजेगाव येथील ठेका विठ्ठल ट्रेडर्स यांनी कोटी ४४ लाख, सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील ठेका विनोद रोंगे यांनी कोटी १३ लाख, पंढरपूर तालुक्यातील मारापूर-तावशी येथील ठेका गुरुमाऊली ट्रेडर्स यांनी शासकीय किमतीपेक्षा १० लाख रुपये वाढवून कोटी ६४ लाख रुपयास घेतला. तेलगाव-अरळी येथील ठेक्यास शासकीय बोलीपेक्षा कोटी रुपये अधिक मिळाले. या ठेक्यासाठी ठेकेदारांमध्ये चांगलीच स्पर्धा झाली. ठेक्याची शासकीय किंमत १० कोटी १५ लाख रुपये होती, हा ठेका १७ कोटी १५ लाख रुपयास प्रतिक एंटरप्रायजेस यांनी घेतला.३७ पैकी ठेक्यांचे लिलाव गेल्याने आता उर्वरित ३२ ठेक्यांचे लिलाव पुढील टप्प्यात काढण्यात येणार आहेत.