आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टिप्परच्या धडकेत कामगाराचा मृत्यू,सातरस्ता सिटीबस डेपोजवळ भीषण अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रंगभवनहून अासऱ्याकडे दुचाकीवर जाताना पाठीमागून टिप्परची धडक बसून झालेल्या अपघातात बंडू यशवंत वडणे (वय ५६, रा. गाैरव नगर, निराळे वस्ती) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला अाहे. हा अपघात सोमवारी दुपारी दोनच्या सुमाराला सातरस्ता भागातील सिटीबस डेपोसमोर घडला.

शशिकांत शिवाजी पवार (वय ३५, रा. दमाणी नगर, सोलापूर ) हे जखमी झाले अाहेत. पवार वडणे हे दुचाकीवर ( एमएच १३ एस ३९५५) जात होते. वाहनाच्या एक बाजूला दहा फूट लांबीचे पाइप बांधले होते. सिटीबस डेपोजवळ अाल्यानंतर टिप्परची (एमएच १७ एजी ४०७६) पाठीगागून धडक बसल्यानेे डोक्याला गंभीर जखम झाली. उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल कल्यानंतर वडणे यांचा मृत्यू झाला. तर पवार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.
वडणे हे मुळे हाॅस्पिटलमध्ये माळी म्हणून काम करत होते. काम संपल्यानंतर सुटीच्या वेळेत खासगी ठिकाणी प्लंबिंगचे काम करत होते. त्याच कामासाठी जाताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात अाले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदाबाई, मुलगा भारत असा परिवार अाहे. सदर बझार पोलिसात या अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात अाली अाहे. हवालदार सुहास अाखाडे तपास करत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...