आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सीईटी; उशिरा पोहोचल्यास नाही प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
सोलापूर - राज्य शासनाच्या वतीने २०१७-१८ करिता अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी २०१७) गुरुवारी शहरातील ३८ केंद्रांवर होणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक तथा निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी दिली.
 
या प्रवेश परीक्षेसाठी एकूण १४ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उमेदवारांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करून परीक्षा केंद्रांवर माहिती पुस्तिकेत नमूद रिपोर्टिंग करण्याच्या वेळेआधीच पोहोचावे. उमेदवार उशिरा पोहोचल्यास त्याबद्दल कोणतीही सबब मान्य करण्यात येणार नाही उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेकरीता प्रवेश केंद्रावर प्रवेश नाकारण्यात येईल.
 
उमेदवारांना ॲडमिट कार्ड (प्रवेशपत्र) ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या लॉगइनमधून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत १४४ कलम लागू राहील. परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थ्यांस परीक्षा केंद्र सोडून बाहेर जाता येणार नाही.
बातम्या आणखी आहेत...