आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीत व्यक्तिपूजा अध:पतनाचा हुकूमशाहीचा मार्ग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - संविधानाच्या सरनाम्याचाप्रारंभ आम्ही भारतीय जनता असा करता, परमेश्वर ईश्वराच्या नावाने करावा, अशी दुरुस्ती एच. व्ही. कामत यांनी सूचविली होती. यावर चर्चा होऊन एकेचाळीस विरुद्ध अठ्ठेचाळीस अशा मताने ती फेटाळण्यात आली. कारण संविधाननिर्मितीचे श्रेय भारतीय जनतेस आहे. सार्वभौमत्व भारतीय जनतेकडे आहे. सरनाम्यात जनतेची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.

ब्रिटिश साम्राज्यशाहीचा प्रतिकार भारतीय जनतेने सार्वभौमत्वासाठीच केला होता. १९४६ मधील उद्दिष्टाच्या ठरावात बंधुत्व हा शब्द नव्हता. बंधुत्व या संकल्पनेचे महत्त्व आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी एकात्मतेसाठी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन बाबासाहेबांनी केले. राष्ट्र बांधणीसाठी बंधुत्व ही पूर्वअट तर जातिसंस्था राष्ट्रविरोधी आहे, अशी मांडणी आंबेडकरांनी संविधान अपर्ण करताना केलेली होती.

भारतीय संविधान प्राचीन भारतीय राजनीतीच्या प्रारूपावर आधारलेले असावे. त्यानुसार खेडे हा संविधानाचा केंद्रबिंदू असावा असा काहीचा अाग्रह होता. डाॅ. अांबेडकरांनी खेडे हे रिपब्लिकन होऊ शकत नाही. जे प्रांतवादाचा, सांप्रदायिकतेचा विरोध करतात, ते खेडे हा संविधानाचा केंद्रबिंदू असावा, असा आग्रह कसा धरू शकतात? खेडे हे अज्ञानाची, कोत्या मानसिकतेची गुहा आहे, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकरांनी केले होते. खेड्यांएेवजी माणूस हा संविधानाचा केंद्रबिंदू आहे. भारतीय संविधान मनुष्यकेंद्री आहे. विवेकमान्य कार्यकारणभाव आणि व्यक्तीची प्रतिष्ठा या उदारमतवादी मूल्यावर भारतीय संविधानाची निर्मिती आहे. म्हणूनच सरंजामशाही मूल्यावर आधारलेल्या खेडे या घटकाऐवजी व्यक्ती हा घटक संविधानाने केंद्रबिंदू मानल्याचे सांगितले. संविधानाचा सरनामा व्यक्तीला तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची शाश्वती देतो. एक व्यक्ती एक मत हे मूल्य प्रस्थापित झाले आहे. परंतु एक व्यक्ती एक मूल्य अजून प्रस्थापित व्हावयाचे आहे. त्यासाठी झटावे लागेल.

प्रा.डॉ. टी. एस. मोरे,बार्शी, राज्यशास्त्राचे अभ्यासक
व्यक्तिपूजा किंवा विभूतीपूजा लोकशाहीस घातक आहे. व्यक्तीपेक्षा देश मोठा असतो, विभूतीपूजा हुकूमशाहीस आमंत्रण ठरते. स्वातंत्र्य विकून एखाद्या राष्ट्राला व्यक्तीबाबत कृतज्ञता व्यक्त करता येणार नाही, जसे स्त्रीला आपले चारित्र्य विकून कृतज्ञता व्यक्त करता येणार नाही. लोकशाहीत विभूतीपूजा अध:पतनाचा हुकूमशाहीचा मार्ग आहे. भारतीयांनी ही बाब विचारात घ्यावी, असा इशारा डॉ. आंबेडकर अापणास देतात.