आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Discussion Over Siddheshwar Fair With Chief Minister

सिद्धेश्वर यात्रा वाद: न्यायालय, मंत्रालयात घडामोडी; मुख्यमंत्र्यांसमवेत आज पुन्हा बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी धर्मराज काडादी, खासदार शरद बनसोडे, अॅड. मिलिंद थोबडे आदी. दुसऱ्या छायाचित्रात होम मैदान येथे मंगळवारी दुपारी यात्रेसाठी पाळण्याचे साहित्य आले.
सोलापूर - ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेत प्रशासनाकडून आडकाठी होत असल्याच्या कारणाने शहरातील विविध महिला मंडळांकडून मंगळवारी मोर्चा काढण्यात येणार होता. समन्वय आणि योग्य नियोजनअभावामुळे आजचा मोर्चा फसला. मात्र, महिला मंडळांनी चक्री उपोषणात सहभागी होऊन मंदिर समितीला पाठिंबा दर्शवला.दोन दिवसांपूर्वीच्या सिद्धेश्वर मंदिरातील महिलांच्या निषेध बैठकीत मंगळवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मोर्चा होणार म्हणून आज सकाळापासूनच बाळीवेसमधील श्री मल्लिकार्जुन मंदिरजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मात्र मोर्चाच्या वेळेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने महिला मल्लिकार्जुन मंदिराकडे फिरकल्याच नाही. समन्वयाचा अभाव आणि पाण्याचा दिवस असल्याने महिलांचा सहभाग नसल्याचे दिसून आले.

आज मांडणार म्हणणे...
सिद्धेश्वर महायात्रा आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार व्हावी, यासंबंधी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती यांनी दिलेल्या सूचनेनुसार बुधवारी सकाळी संबंधित बेंचसमोर आम्ही म्हणणे मांडू. महेश गाडेकर, याचिकाकर्ते.