आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रचाराचा पंधरवडा संपला; आज ६८७ जण भवितव्य अाजमावणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - गेल्या महिनाभरापासून राजकीय चर्चेने गाजत असलेल्या आणि ११ नोव्हंेबरपासून प्रचाराने राळ उठलेल्या जिल्ह्यातील आठही नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या १६६ जागांसाठी रविवारी (दि.२७) मतदान होत आहे. दोन्ही पदासाठी इच्छुक ६८७ जणांचे राजकीय भवितव्य रविवारी मतदानयंत्रात बंद होत आहे. जिल्हाभरात एकूण २८६ मतदान केंद्रांवर मतदान होत असून, यासाठी १५९८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत.निवडणूक विभागाने मतदानाची तयारी केली.
महिनाभरापासून सुरू असलेला प्रचाराचा धुराळा शनिवारी सायंकाळी संपला असून, त्यानंतर सर्वत्र वैयक्तीक गाठी-भेटीवर सर्वच उमेदवारांनी विशेष भर दिला होता. एकीकडे राजकीय पक्षांची रविवारच्या मतदानात जास्तीत जास्त मतदान आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी तर दुसरीकडे प्रशासनाची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लगीनघाई सुरू असल्याचे दिसून आले. मतदानाची टक्केवारी किती वाढते, यावर सत्तेच्या समीकरणांची दिशा बदलू शकते. दरम्यान, आठही पालिकांची सोमवारी मतमोजणी आहे. दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे.
बातम्या आणखी आहेत...