आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ नामांतरासाठी शिक्षणमंत्र्यावर उधळला भंडारा; लिंगायत संघटनांचाही माेर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर- साेलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी हाेळकर यांचे नाव देण्याची मागणी धनगर संघटनांतून हाेत असतानाच साेमवारी लिंगायत समाजातील काही संघटनांनीही विद्यापीठाला सिद्धेश्वरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी शहरात माेर्चा काढला. त्यामुळे विद्यापीठ नामांतराचा विषय चिघळण्याची चिन्हे अाहेत. दरम्यान, अादर्श शिक्षक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी शहरात अालेले शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळत व नामांतर मागणीचे निवेदन फेकून धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी सरकारविराेधात घाेषणाबाजीही केली.  
हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे आले हाेते. उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना हा प्रकार घडला. उमेश काळे, शेखर बंगाळे, शरानू हांडे, अनिल घोडके, मळाप्पा नवले अशी निवेदन व भंडारा टाकणाऱ्यांची नावे आहेत. या प्रकारानंतर शिक्षणमंत्री म्हणाले की, ‘विद्यापीठ नामांतरास व अहिल्यादेवी होळकर नाव देण्यास शिक्षणमंत्री विरोध करीत आहेत, अशी चर्चा पसरवली जात अाहे. ती चुकीची अाहे. काही जणांना खूप घाई असते, वृत्तपत्रात फोटो यावेत, प्रसिद्धी मिळावी, स्टंटबाजी केली जाते. तरी  सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्यांनी काही नावाची शिफारस शासनाकडे केली आहे. त्यानुसार शासन स्तरावर योग्य पद्धतीने निर्णय घेतला जाईल,’  असे आश्वासन त्यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...