आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव मंडळाची अाज होणार बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिस अायुक्तालयात शनिवारी सायंकाळी पाचला गणपती उत्सव मंडळाची बैठक होणार अाहे. सप्टेंबरपासून गणपती उत्सवाला सुरुवात होत अाहे. मंडळाच्या काही समस्या पोलिसांच्या सूचना जाणून घेण्यासाठी एकत्रित ही बैठक होत अाहे.
यावेळी महापालिका, वीज वितरण विभाग, बांधकाम विभाग अधिकारी शहरातील सर्व पोलिस अधिकारी यांची संयुक्तपणे ही बैठक होत अाहे. सप्टेंबरला गणेशमूर्ती विकण्याचे स्टाॅल विजापूर रोड (संभाजी तलावजवळ), होम मैदान, पुंजाल मैदान या ठिकाणी लावण्यासाठी पोलिसांनी सूचना केली अाहे. सुमारे पन्नास जणांनी परवाना घेण्यासाठी अर्ज केला अाहे. राजेंद्र चौकातील मूर्ती विक्रेत्यांना जागा कुठे द्यायची याबाबत अजून निर्णय होणार अाहे. महापालिका पोलिस यांच्याकडे अर्ज केल्यानंतर स्टाॅलसाठी परवाना देण्यात येणार अाहे. ही माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.

हजार विद्यार्थ्यांची मदत
गणपती उत्सव काळात पोलिसांसोबत बंदोबस्त देण्यासाठी ८०० पोलिस छात्र मित्र योजनेचे विद्यार्थी साडेतीन हजार महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मदत पोलिस घेणार अाहेत. यंदा अाधुनिक पद्धतीने बंदोबस्तासाठी कशी मदत घेता येईल. म्हणजे व्हाॅटसग्रुप तयार करणे, पोलिसांसोबत थेट बंदोबस्तात सहभाग घेणे यासाठी पोलिसांचा विचार सुरू अाहे. या योजनेला अजून अंतिम स्वरूप देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
सोलापूर पोलिसअायुक्तालयात शनिवारी सायंकाळी पाचला गणपती उत्सव मंडळाची बैठक होणार अाहे. सप्टेंबरपासून गणपती उत्सवाला सुरुवात होत अाहे. मंडळाच्या काही समस्या पोलिसांच्या सूचना जाणून घेण्यासाठी एकत्रित ही बैठक होत अाहे.

यावेळी महापालिका, वीज वितरण विभाग, बांधकाम विभाग अधिकारी शहरातील सर्व पोलिस अधिकारी यांची संयुक्तपणे ही बैठक होत अाहे. सप्टेंबरला गणेशमूर्ती विकण्याचे स्टाॅल विजापूर रोड (संभाजी तलावजवळ), होम मैदान, पुंजाल मैदान या ठिकाणी लावण्यासाठी पोलिसांनी सूचना केली अाहे. सुमारे पन्नास जणांनी परवाना घेण्यासाठी अर्ज केला अाहे. राजेंद्र चौकातील मूर्ती विक्रेत्यांना जागा कुठे द्यायची याबाबत अजून निर्णय होणार अाहे. महापालिका पोलिस यांच्याकडे अर्ज केल्यानंतर स्टाॅलसाठी परवाना देण्यात येणार अाहे. ही माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.

हजार विद्यार्थ्यांची मदत
गणपती उत्सव काळात पोलिसांसोबत बंदोबस्त देण्यासाठी ८०० पोलिस छात्र मित्र योजनेचे विद्यार्थी साडेतीन हजार महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मदत पोलिस घेणार अाहेत. यंदा अाधुनिक पद्धतीने बंदोबस्तासाठी कशी मदत घेता येईल. म्हणजे व्हाॅटसग्रुप तयार करणे, पोलिसांसोबत थेट बंदोबस्तात सहभाग घेणे यासाठी पोलिसांचा विचार सुरू अाहे. या योजनेला अजून अंतिम स्वरूप देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...