आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रमाग कामगार आज मानवी साखळी करणार, उत्पादन बंदच्या विरोधातील संघर्ष शिगेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कामगार भविष्य निर्वाह निधीच्या विरोधात यंत्रमागधारकांनी उत्पादन बंद पुकारला. त्याच्या विरोधात कामगार संघटनांनी गेले दहा दिवस संघर्ष सुरू केला. दिवाळी आली तरी कारखानदार धजत नाहीत, दुसरीकडे शासकीय यंत्रणाही मूग गिळून गप्प आहे. या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी कामगार सोमवारी मानवी साखळी करणार आहेत. अक्कलकोट रस्त्यावरील एमआयडीसीत हे अांदोलन होईल. 

जाहीर सभेची नववी सभा रविवारी येथे झाली. विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड धरणे आंदोलन झाले. या वेळी ते म्हणाले, “कामगारांच्या लढाईची परिसीमा आता आेलांडलेली आहे. गेल्या दहा दिवसांत धरणे, निदर्शने, माेर्चा सर्व झाले. मंत्र्यांपासून सहायक कामगार आयुक्तांना निवेदने दिली. परंतु कारखानदार उत्पादन सुरू करत नाहीत. दुसरीकडे एेन दिवाळीत कामगारांची उपासमार सुरू झाली. या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारच्या मानवी साखळीत सहभागी व्हा.” 

लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनचे नेते व्यंकटेश कोंगारी म्हणाले, “ऊन, वारा, पाऊस म्हणता कामगार आज रस्त्यावर उतरला. परंतु धनदांडग्यांना त्याची तमा नाही. कामगारांचे शोषण करून मोठे झालेल्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. परंतु कामगारांनी एकी तोडली नाही. ही एकी कायम असल्याचे दाखवण्यासाठीच सोमवारी मानवी साखळी होईल. ती संपूर्ण एमआयडीसीला घेरून जाईल. त्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कामगारांची ताकद दाखवावी.” 
 
या वेळी युसुफ मेजर, मुरलीधर सुंचू, बाबू कोकणे, श्रीहरी साका, शहाबुद्दिन शेख, अशोक बल्ला आदी मंचावर होते. किशोर मेहता यांनी सूत्रसंचालन केले. अनिल वासम यांनी आभार मानले. 
बातम्या आणखी आहेत...