आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीपूजनच्या खरेदीसाठी ओसंडल्या पेठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिवाळीत घरोघरी लक्ष्मी-कुबेर पूजन करण्यात येते. रविवारी (दि.३०) लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साळीच्या लाह्या, केळीचे खुंट, बत्ताशे झेंडूची फुले खरेदीसाठी शनिवारी झुंबड उडाली.
शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत दिवाळी निमित्ताने खरेदीसाठी लगबग आहे. शनिवारी नरकचतुर्दशी निमित्ताने पहाटे अभ्यंगस्नान करण्यात आले. शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरू असल्याने कर्मचारी कामावर होते. पण, दुपारनंतर महापालिका, जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी लवकर बाहेर पडल्याने कार्यालय आेस पडल्याचे चित्र होते.
शहरातील मधला मारुती, टिळक चौक, कुंभारवेस, पूर्वभागातील अशोक चौक बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती. पूजेसाठी लागणारी झेंडूची फुले २० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू होती. पूजेसाठी लक्ष्मी-कुबेर फोटो खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू होती.

पूजाविधि : आचमन, प्राणायम करून श्रीमन्महागणाधिपतेयनम: असे म्हणून पुढे दिलेला संकल्प म्हणावा.

संकल्प : मम महालक्ष्मीप्रीतिद्वारा विपुलश्रीप्राप्ति सन्मंगल महैश्वर्य कुलाभ्युदय सुखसमृद्धयादि कल्पोक्त फलसिद्धयर्थं लक्ष्मीकुबेर पूजनं करिष्ये, असे म्हणून हातावरून पाणी सोडावे. आदौ निर्विघ्नता सिद्धयर्थं महागणपति पूजनं करिष्ये असे म्हणून प्रथम मांडून ठेवलेल्या सुपारीवर गणपतीचे आवाहन करून पूजन करावे. नंतर कलश पूजन करून ताम्हनातील सोने, रुपयावर महालक्ष्म्यै नम: महालक्ष्मीमावाहयामी असे म्हणून अक्षता वाहाव्यात. ताम्हनात ठेवलेल्या सुपारीवर कुबेरायनम: कुबेरमावाहयामि असे म्हणून अक्षता वाहाव्यात. या प्रमाणे देवतांचे आवाहन करून ध्यान करावे.

ताम्हनात अथवा वाटीत सोन्याची अंगठी किंवा चांदीचे नाणे आणि काही रुपये एक सुपारी ठेवावी. पाणी भरून एक कलश त्यावर नारळ ठेवावा. विडे गणपती मांडावा. एवढी तयारी करून घेऊन पूजेस सुरुवात करावी. पूजा करणाऱ्याने कपाळी कुंकू लावावे.

ध्यानाचे मंत्र : कमला चपला लक्ष्मीश्चलाभूतिर्हरिप्रिये। पद्मालया संपत् उच्चै: श्री: पद्मधारिणी नमस्ते सर्व देवानां वरदासि हरि प्रिये। यागतिस्त्वत् प्रपन्नानां सा मे भूयात्त्वदर्चनात्।। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते। धनदायनमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच। भवंतु त्वत् प्रसादान्मे धनधान्यादि संपद:।।
हे मंत्र म्हणून नंतर गंध, फूल, अक्षता वाहून श्री सूक्ताने अभिषेक करून पुसून ठेवावे. गंधादि पंचोपचार (गंध, अक्षता, हळद-कुंकू, अष्टगंध, अरगजा, बुक्का, धने, जिरे, लाह्या, बत्तासे, फुले, तुळशी, धूप, दीप, नैवेद्य (पेढ्याचा) फळ, तांबूल, दक्षिणा, आरती, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा या क्रमाने) पूजा करावी. धने, लाह्या, बत्ताशे, पेढे नारळ असा प्रसाद द्यावा.
वह्यांची खरेदीसाठी गुरुवार पेठेत व्यापाऱ्यांची झंुबड.
बातम्या आणखी आहेत...