आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाके विक्री स्टॉल प्रकरणी आज होणार अंतिम सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिस प्रशासनाने मधला मारुती परिसरातील फटाके विक्रीला बंदी घातली. याप्रकरणी आळंगे या व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. गुरुवारी न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला. न्यायाधीश पी. बी. मोरे यांनी याची सुनावणी उद्या शुक्रवारी ठेवली आहे.

पोलिस प्रशासनाने होम मैदानासह पाच ठिकाणी फटाके विक्रीस परवानगी दिली. मधला मारुती परिसरात रस्ता लहान असून वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील फटाके विक्रीवर बंदी घातली. या निर्णयाविरुद्ध आळंगे यांनी न्यायालयात धाव घेतली. व्यापाऱ्यांच्या वतीने अॅड. व्ही. एस. आळंगे यांनी युक्तिवाद केला. पोलिस आयुक्त हे कायमस्वरूपी परवानाधारक तात्पुरते लायसन्सधारक यांच्यात भेदभाव करत आहेत राज्य शासनाचा कुठलाही आदेश नसतानादेखील पोलिस आयुक्तांचा आदेश पूर्णपणे चुकीचा आहे. यावर सरकार पक्षाकडून अॅड. नीलेश जोशी यांनी मधला मारुती हा भाग वर्दळीचा आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्तांनी काही सुरक्षित ठिकाणे निवडली आहेत, असा युक्तिवाद केला. उद्या शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी ठेवली.