आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीचा आज मेळावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचा मेळावा दुपारी पंढरपूर येथे तर शहराचा मेळावा सायंकाळी ४.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मेळावे महत्त्वाचे ठरणार आहेत. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर पक्षाने संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली असली तरी अद्याप पक्षाची एकही बैठक आमदार सोपल यांनी घेतली नाही. शिवाय अंतर्गत गटबाजी, पक्षाचे संघटन यावर अजित पवार स्वत: लक्ष देणार आहेत. यादृष्टीने दोन्ही मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पदाधिकाऱ्यांंशी संवाद
या मेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाची बांधणी ते पक्षातील अंतर्गत गटाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. युवा संघटनेपासून ते सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी ते स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा पदाधिकारी यांच्यासाठी ही दिशा देणारी बैठक असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...