Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Today, Solapur-Pune Green Corridor

हिवरेच्या महिलेचे अवयवदान, आज सोलापूर-पुणे ग्रीन कॉरिडॉर; जखमी विवाहितेचा ब्रेनडेड

प्रतिनिधी | Update - Oct 12, 2017, 10:25 AM IST

जीवन आणि मृत्यू हे परमेश्वराच्या हातात आहे. मात्र कविताच्या अवयवदानामुळे काहीना नवजीवन मिळणार आहे. कविता जगन्नाथ डिकरे य

 • Today, Solapur-Pune Green Corridor
  सोलापूर- जीवन आणि मृत्यू हे परमेश्वराच्या हातात आहे. मात्र कविताच्या अवयवदानामुळे काहीना नवजीवन मिळणार आहे. कविता जगन्नाथ डिकरे या ब्रेनडेड झालेल्या महिलेच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. गुरुवारी यशोधरा हॉस्पिटल येथे अवयवदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यातील लिव्हर पुण्याला नेण्यात येणार अाहे, तर दोन्ही किडनींचे प्रत्यारोपण यशोधरा अश्विनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर होणार अाहे. कविता जगन्नाथ डिकरे (वय २८, रा. हिवरे, ता. मोहोळ, सोलापूर ) ही महिला शुक्रवारी (६ ऑक्टोबर) शेतात काम करित होती. दुपारी साडेतीन च्या सुमारास जोरदार पाऊस पडत होता. आडोशासाठी कविता अन्य महिला शेतातील छोट्या मंदिराजवळ थांबल्या होत्या. त्याचवेळी वीज कोसळली. यात एक महिला जागीच गतप्राण झाली. त्या महिलेचा धक्का कविताला बसला. विजेचा जोरात धक्का मेंदूला बसला. यानंतर नातलगांनी लागलीच सोलापूरला उपचारासाठी हलवले. सायंकाळी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मेंदू वगळता शरीराचे अन्य अवयव व्यवस्थित होते. मेंदू मृत आढळल्याने बुधवारी डॉक्टरांनी कविता डिकरे यांच्या नातलगाचे समुपदेशन केले. यानंतर नातलगांनी अवयवदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

  यांचे प्रयत्न मोलाचे ठरले
  सामाजिक कार्यकर्त्या प्रिया पवार यांनी माहिती कळताच यशोधरा हॉस्पिटल येथे धाव घेतली. रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदान करण्याबाबत तळमळीने सांगितले. त्याच वेळी त्यांनी युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही नातेवाइकांशी चर्चा केली. मोहोळ येथील शिवसेनेचे नगरसेवक दीपक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही तत्काळ यशोधरा हॉस्पिटल येथे रुग्णाच्या नातेवाइकांची भेट घेतली अवयवदान करण्यासाठी समुपदेशन केले.

  लिव्हर पुण्याला नेणार
  ब्रेनडेडरुग्ण कविता यांचे लिव्हर पुण्यातील अादित्य बिर्ला रुग्णालयात नेण्यात येणार अाहे. तेथे त्याचे एका रुग्णावर प्रत्यारोपण होईल. तर किडनी कुंभारी येथील अश्विनी अाणि यशोधरा रुग्णालयातील रुग्णांवर रोपण होईल. त्यामुळे तीन जणांना जीवदान मिळणार अाहे. रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार हृदय कोणाला बसवायचे याची चाचणी सुरू होती. अवयव पुण्याला नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केला जाणार अाहे. तशा सूचना पोलिसांना देण्यात अाल्या अाहेत. कोणत्याही क्षणी पोलिस तयार अाहेत.

  प्रथमच जिल्ह्यातला अवयवदाता
  सोलापुरातूनअवयवदान होण्याची ही तिसरी घटना अाहे. या पूर्वी अश्विनी ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालयातून ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले अाहे. या दोन्ही घटनेतील रुग्ण हे िजल्ह्याबाहेरचे होते. यशोधरा रुग्णालयातून पहिल्यांदाच अवयवदान होत अाहे. ही सोलापुरातील तिसरी घटना अाहे. त्यात पहिल्यांदाच िजल्ह्यातील रुग्णाचे अवयवदान होणार अाहे.

  ‘यशोधरा’तील पहिलाच प्रयत्न
  अवयवदानासाठी यशोधरा रुग्णालयाने पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. रुग्णालयातील औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी डिकरे यांचे रक्त अन्य बाबींची तपासणी करण्याकरिता सॅम्पल घेऊन रुग्णवाहिका पुण्याला रवाना झाली. पुण्यातील हॉस्पिटलचा रिपोर्ट आल्यानंतरच डॉक्टर कोणते अवयव कोणत्या ठिकाणी पाठवायचे, याबाबत निर्णय घेतील.

  विता डिकरे मोहोळ तालुक्यातील हिवरेच्या
  कविताडिकरे यांचे पती जगन्नाथ डिकरे हे बीबी दारफळ येथील लोकमंगल कारखान्यात उत्पादन विभागात कामाला आहेत. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. आदित्य हा ११ वर्षांचा असून, जि. प. शाळेत शिकतो. तर अदिती ही वर्षांची असून, नेताजी हायस्कूल येथे तिचे शिक्षण सुरू आहे.

Trending