आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज, उद्या शाळा बंद ठेवण्याचा "शिक्षण संस्था बचाव'चा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; राज्यशिक्षण संस्था बचाव समितीने आणि १० डिसेंबर रोजी शहर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. सोलापुरातील शिक्षण संस्थाचालक राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. हे आंदोलन विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आले आहे.
आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुख्याध्यापक भवन येथे शिक्षण संस्थांचे संस्थापक, मुख्याध्यापक संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक झाली. शिक्षण संस्थाचालकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अहवाल त्वरित मान्य करणे, नोव्हेंबर २००५ पूर्वी नंतर सेवेत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम ठेवणे, लिपीक, शिपाई पदे मान्य करणे, शालेय पोषण अाहार स्वतंत्रपणे राबवणे, शाळाबाह्य काम देणे आदी मागण्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मनोहर सपाटे, शिवाजी जमाले, रिजवान शेख, रंगसिद्ध दसाडे, तानाजी माने, श्रावण बिराजदार, अण्णासाहेब भालशंकर, श्रीशैल तळवार, अॅड. जैद शेख, विद्यानंद स्वामी उपस्थित होते.

बहुतांश शाळादोन दिवस बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांना सुटी दिली आहे. ज्या शाळा चालू राहतील त्या विद्यार्थ्यांची तारांबळ होणार नाही. शासन अनेक जाचक अटी लादत आहे. शिक्षण संस्थांच्या मागण्यांकडे नकारात्मक दृष्टीने पाहत आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांनी सहभागी व्हावे.'' तानाजी माने, मुख्याध्यापक,शरदचंद्र पवार प्रशाला

शाळा बंदठेवण्याबाबत कोणतेही िनवेदन अथवा सूचनांची माहिती कळवण्यात आली नाही. शाळा बंद ठेवणार आहेत तर कोणत्या अादेशानुसार ठेवणार याविषयी चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.'' विष्णू सरगर, शिक्षणाधिकारी,माध्यमिक शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना तानाजी माने. यावेळी मनोहर सपाटे, रिजवान शेख, श्रावण बिराजदार, अॅड. जैद शेख, अण्णासाहेब भालशंकर आदी.
बातम्या आणखी आहेत...