आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी धरण आज अधिक स्थितीत येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या काही दिवसांपासून पुणे परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वरच्या धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत उजनी धरणातील जलसाठा वजा ०.३७ इतका होता. तो अधिक स्थितीत येण्यासाठी सोमवार सकाळपर्यंत वाट पाहावी लागेल.

दौंड बंडगार्डन येथून एकूण १० हजार ८३३ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे उजनी परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. पण शनिवार-रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने येणारा विसर्गही घटला आहे. त्यामुळेच सोमवारी उजनी धरण अधिक स्थितीत येण्याची शक्यता आहे.

तात्पुरता दिलासा
उजनीधरण सोमवारी अधिक स्थितीत जाईल. पण त्यातही फारशी वाढ झालेली नसेल. येत्या काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरच उजनीतील जलसाठा वाढेल. उजनीतील पाण्यावर पिण्याच्या पाण्याची तहान भागेल. पण शेतीसाठी पाणी घेणे सध्यातरी खूपच दुरापास्त झाले आहे. आगामी काळात ते आणखी कठीण होणार आहे.

रविवारी विसर्ग घटला
पावसानेपुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये चांगला साठा झाला आहे. पवना धरण ७७, मुळशी ७३, पानशेत धरण ६४ टक्के भरले आहे. त्यामुळे भीमा नदीत विसर्ग सुरू झाला आहे. पण पावसाने दडी मारल्याने रविवारी विसर्गही घटला. शुक्रवारी जवळपास ४० हजार क्युसेक विसर्ग होता. तो आता १० हजारावर आला आहे.