आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरासाठी उजनी धरणातून आज पाणी सोडले जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एनटीपीसीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने शासनाने शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पाणी सोडण्याचे पत्रही सिंचन विभागाला देण्यात आले. त्यानुसार आज शनिवारी दुपारनंतर शहरासाठी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. मागील वेळी औज बंधाऱ्यामध्ये पाणी पोहचण्यास उशीर झाल्याने साडेसहा टीएमसी पाणी लागले होते. आताही तशीच परिस्थिती असल्याने एक टीएमसी पाणी अधिक लागण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार तातडीने पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्री महाजन यांनी दिले आहेत. लाभक्षेत्र प्राधिकरणाने आदेश मिळताच तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. आैज बंधाऱ्यात लवकर पाणी पोहचावे, यासाठी इतर सर्व बंधाऱ्यावरील दरवाजे काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी दरवाजे काढण्यात आले आहेत. शनिवारी दुपारनंतर धरणातून पाणी सोडण्यात येणार अाहे.

शासन आदेश मिळाले...
^शासनाकडून शहरालापाणी सोडण्याचे आदेश मिळाले आहेत. नदीपात्रातील बंधाऱ्याचे दरवाजे काढल्याचा अहवाल शनिवारी मिळण्याची शक्यता आहे. तो मिळताच पाणी सोडण्यात येईल.'' शिवाजी चौगुले, अधीक्षकअभियंता, लाभक्षेत्र प्राधिकरण.

लाभ शेतीला का शहराला?
पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणामध्ये तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. त्यापैकी दीड टीएमसी पाणी उजनीमध्ये पाेहचले. मात्र या पाण्याचा लाभ शेतीसाठी की सोलापूर शहराला पिण्यासाठी कितपत होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. उजनीतून शहरासाठी पाच टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय असला तरी त्यापेक्षा अधिक पाणी सोडावे लागणार आहे.