सातारा- शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मागे घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (सोमवार) केली. दरम्यान, पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
यासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी एक पत्रक जाहीर केले आहे. त्यात ते म्हणाले, की पुरंदरे यांना जाहीर झालेला पुरस्कार मागे घेण्याची आम्ही मागणी करीत आहोत. त्यावर शासनाने गांभीर्याने विचार करावा.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही मागणी लावून धरली आहे. पुरंदरे यांनी सांगितलेला इतिहास वास्तविकतेला अनुसरून नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनाही आव्हाड यांची री ओढली आहे. त्यांनीही पुरंदरे यांनी मांडलेला इतिहास तथ्यांना धरुन नसल्याचे म्हटले आहे.
या विषयी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र पुरंदरे यांचे समर्थन केले आहे. त्यांनी इतरांनाही सज्जड दम दिला आहे.
उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्रक वाचा पुढील स्लाईडवर.....
दोन्ही आरोपी पोलिसांना शरण; अकोल्यातील तरुणाचे लैंगिक शोषण
अकोला - तरुणाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले येथील भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेच्या राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष नीरंजनकुमार गोयनका आणि सचिव जुगलकिशोर रुंगटा हे मागील 40 दिवसांपासून फरार होते. दरम्यान, दोघेही आज (सोमवार) दुापारी 12 वाजताच्या सुमारास स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाले. पीडित युवकाने स्टिंग ऑपरेशन करून हे प्रकरण उघडकीस आणले होते.
या बातमीचे आणखी अपडेट्स वाचा पुढील स्लाईडवर....
दिवसभरातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी पुढील स्लाइड्वर क्लिक करा....