आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज मूकमोर्चा; घडेल स्वयंशिस्तीचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मराठा समाजाच्या वतीने महा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे सर्व पातळीवरील नियोजन पूर्ण झाले आहे. मोर्चाचा संभाजी राजे चौक ते होम मैदान असा मार्ग असला तरी शहरातील सर्व प्रमुख रस्ते नागरिकांनी व्यापतील, इतकी गर्दी होईल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. सकाळी वाजता जिजाऊ वंदना, १२ वाजता श्रद्धांजली आणि वाजता निवेदन वाचन असे मोर्चाचे स्वरूप असणार आहे. मोर्चाच्या अग्रभागी मराठा समाजातील मुली असणार आहेत, त्याच मोर्चाचे सारथ्य करणार आहेत.
पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले आहे. संयोजकांनी स्वयंशिस्त राहण्यासाठी १०० वॉकीटॉकी ठेवल्या आहेत. स्वयंसेवक म्हणून हजार ‘मावळे’ आणि हजार ‘हिरकणी’ मदतीला असणार आहेत. प्रत्येक हजार मीटरवर ५० जणांचे पथक कार्यरत राहणार आहे. शिवाय हजार मावळे १०० हिरकणी या होम मैदानावर कार्यरत राहतील. मोर्चाचा समारोप झाल्यानंतर सर्व मावळे हे स्वच्छतेचे काम करणार आहेत. मोर्चा मार्ग, मोर्चा स्थळ आदी ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करण्याची जबाबदारी मावळ्यांवर असणार आहे.

आरक्षणाकडेदुर्लक्ष केल्यानेच समाजात उद्रेक : तटकरे राष्ट्रवादीकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, समाजाच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या जात आहेत. मराठा समाजासह मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. मात्र आताच्या सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. त्याचाच उद्रेक म्हणून आज महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. दरम्यान खासदार विजयसिंह मोहिते यांनी कुटुंबीयांसमवेत आंदोलन कार्यालयास भेट दिली.

यासंघटनांचा आहे पाठिंबा : वीरशैवयुवक प्रतिष्ठान, महाराष्ट्र वीरशैव सभा, जैन संघटना, मारवाडी समाज, तेली समाज, बंजारा समाज, काशीकापडे समाज, विश्वब्राह्मण समाज, धनगर समाज, पद्मशाली समाज, नवी पेठ व्यापारी असोसिएशनसह संघटनांनी पाठिंबा दिला.
शहरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. मराठा मूक मोर्चासाठी शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला, नूमवि प्राथमिक शाळा, सेंट जोसेफ, शारदा विद्यालय, बालिका विद्यालय, केएलई, मेहता शिशु शाळा तसेच आयएमएस, दमाणी विद्यामंदिर, ए. डी. जोशी यांनी शाळा बंद ठेवल्या आहेत. मनपाच्या अंतर्गत येणाऱ्या सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांना लवकर सोडण्यात यावेत. शाळांना सुटी देण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा, असे पत्र मनपा शिक्षण मंडळाकडून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले. मुख्याध्यापक यांना वर्षातून एक सुटी घेता येते. त्या सुटीचा उपयोग मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी केला जाईल. तसेच स्कूल बसचालकांनी वाहन चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही.

शहरातील सकाळच्या सत्रात भरविण्यात येणाऱ्या शाळांना पत्राद्वारे विद्यार्थ्यांना लवकर सोडविण्यात यावे. मुख्याध्यापकांनी पालकांना मुले लवकर घेऊन जावे, अशा सूचना दिल्या आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापकांना सुटी घेण्याचे अधिकार दिले आहेत, असे मनपा प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे यांनी सांगितले.
मंगळवारी दुपारी होम मैदान येथे मंच उभारणीचे काम सुरू होते, त्यावेळी टिपलेले छायाचित्र.

महिलांसाठी विशेष व्यवस्था
प्रथमच मोठ्या संख्येने युवती महिला सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी होम मैदान, शिवाजी चौक, पुना नाका याठिकाणी सार्वजनिक सुविधांची व्यवस्था केली आहे. होम मैदानाशेजारी १०० पेक्षा अधिक तात्पुरते टॉयलेट उभे करण्यात आले आहेत. शिवाय मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पाणी पाकीटचे वाटप करण्यात येणार आहे.

नाश्ता आणि पाणी वाहनातच
प्रत्येक गावांतून स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी विचारात घेऊन प्रत्येक वाहनामध्ये नाश्ता, जेवण पाणी बाटल्या या संबंधित तालुक्यातूनच देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणाहून वाहन निघणार आहे, त्या तालुक्याच्या ठिकाणी मार्गावर अशी व्यवस्था केली आहे. यामुळे नागरिकांचा वेळही जाणार नाही आणि गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.

या पाच तरुणी करतील सारथ्य
सकल मराठा महामोर्चाचे सारथ्य करण्याची संधी सोनल भोसले, सायली बचुटे, ऐश्वर्या चव्हाण, स्वराली मुळे प्रियंका डोंगरे या मुलींना मिळणार आहे. या मुलींच्या हस्ते सुरुवातीला संभाजी राजे, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होम मैदानावर पोहोचतील. त्या ठिकाणी मोर्चाची भूमिका मांडतील.

गर्दी लक्षात घेऊन होम मैदान ते संभाजी राजे चौकापर्यंत ११० स्पीकर तर होम मैदान आणि परिसरात १०० स्पीकर लावण्यात आले आहेत. म्हणजे होम मैदानावर सुरू असलेले नियोजन कार्यक्रम हे संभाजी राजे चौकातील प्रत्येक मोर्चेकऱ्यापर्यंत पाेहोचणार आहे. याद्वारेच सर्व संदेश, सूचना दिल्या जाणार आहेत. राष्ट्रगीत, जिजाऊ वंदना आणि निवेदन वाचनही याद्वारे ऐकायला मिळणार आहे.
महापालिकेने मोर्चासाठी हाेम मैदान दिले मोफत
पुणे नाका तुळजापूर मार्गे सोलापुरात दाखल होणाऱ्या एसटी गाड्या शिवाजी चौकातून थेट बस स्थानकावर आणता सम्राट चौक मार्गे विभाग नियंत्रक कार्यालयाच्या बाजूने बसस्थानकावर आणल्या जाणार आहेत.

मंगळवारी पोलिस आयुक्तांचे एसटी प्रशासनास पत्र प्राप्त झाले असून यात वाहतूक मार्गात बदल करावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मोर्चा काळात त्या नंतरही काही वेळ एसटी गाड्या सम्राट चौक मार्गेच बाहेर पडणार आहेत. गाड्यांच्या परिचालनासाठी एसटी प्रशासन १० ठिकाणी कर्मचारी नियुक्त करणार आहे. यात सोलापूर बसस्थानक, पुणे नाका, अक्कलकोट रोड वरील पाण्याची टाकी, रंगभवन, बाळे, कारंबा, जी एम चौक, देगाव नाका, भय्या चौक, आयटीअाय पोलिस चौकी आदी ठिकाणी एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. हे रस्त्यावरील वाहतुकीची माहिती एसटीच्या नियंत्रण कक्षाला कळवतील. त्यानुसार गाड्या धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.
मराठा समाज क्रांती मूकमोर्चासाठी होम मैदान मोफत देण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चास महापालिका सभागृहात एकमताने ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर महापालिकेची मंगळवारी होणारी सर्वसाधारण सभा श्रद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात आली.

उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. तातडीचा प्रस्ताव सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी मांडला. मोर्चासाठी होम मैदान मोफत देणे तसेच तेथे सुविधा देण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता दिली. मैदानावर महापालिकेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. त्यासाठी ८० कर्मचारी होते. बुधवारी ५० कर्मचारी असणार आहेत. दहा घंटागाड्या असतील.
अत्यावश्यक बाब म्हणून डफरीन हाॅस्पिटल येथे दहा बेड राखीव ठेवण्यात आले. वैद्यकीय पथक असणार आहे. अग्निशमन गाड्या, आवश्यक त्या ठिकाणी बॅरेकेडिंग करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी सातच्या आत मोर्चामार्ग स्वच्छ करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. पाण्याची सोय महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी टँकर उभे करण्यात येणार आहेत.
महापालिकेने मोर्चासाठी हाेम मैदान दिले मोफत
पुणे नाका तुळजापूर मार्गे सोलापुरात दाखल होणाऱ्या एसटी गाड्या शिवाजी चौकातून थेट बस स्थानकावर आणता सम्राट चौक मार्गे विभाग नियंत्रक कार्यालयाच्या बाजूने बसस्थानकावर आणल्या जाणार आहेत.

मंगळवारी पोलिस आयुक्तांचे एसटी प्रशासनास पत्र प्राप्त झाले असून यात वाहतूक मार्गात बदल करावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मोर्चा काळात त्या नंतरही काही वेळ एसटी गाड्या सम्राट चौक मार्गेच बाहेर पडणार आहेत. गाड्यांच्या परिचालनासाठी एसटी प्रशासन १० ठिकाणी कर्मचारी नियुक्त करणार आहे. यात सोलापूर बसस्थानक, पुणे नाका, अक्कलकोट रोड वरील पाण्याची टाकी, रंगभवन, बाळे, कारंबा, जी एम चौक, देगाव नाका, भय्या चौक, आयटीअाय पोलिस चौकी आदी ठिकाणी एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. हे रस्त्यावरील वाहतुकीची माहिती एसटीच्या नियंत्रण कक्षाला कळवतील. त्यानुसार गाड्या धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.
मराठा समाज क्रांती मूकमोर्चासाठी होम मैदान मोफत देण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चास महापालिका सभागृहात एकमताने ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर महापालिकेमंगळवारी होणारी सर्वसाधारण सभा श्रद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात आली.
उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. तातडीचा प्रस्ताव सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी मांडला. मोर्चासाठी होम मैदान मोफत देणे तसेच तेथे सुविधा देण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता दिली. मैदानावर महापालिकेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. त्यासाठी ८० कर्मचारी होते. बुधवारी ५० कर्मचारी असणार आहेत. दहा घंटागाड्या असतील.
अत्यावश्यक बाब म्हणून डफरीन हाॅस्पिटल येथे दहा बेड राखीव ठेवण्यात आले. वैद्यकीय पथक असणार आहे. अग्निशमन गाड्या, आवश्यक त्या ठिकाणी बॅरेकेडिंग करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी सातच्या आत मोर्चामार्ग स्वच्छ करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. पाण्याची सोय महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी टँकर उभे करण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...